अनलॉक -5 साठी गाईड लाईन्स जारी; काय सुरू, काय बंद? जाणून घ्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-  देशातील कोरोना व्हायरसची पार्श्वभूमीवर लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक -5 साठी गाईड लाईन्स जारी केल्या आहेत.

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या गाईड लाईन्स नुसार, 30 नोव्हेंबरपर्यंत कंटेन्मेंट झोनमध्ये म्हणजेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाऊन कायम असणार आहे,

असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात व्यक्ती व वस्तूंच्या आंतरराज्यीय वाहतुकीवर कोणतेही बंधन नाहीत. यासाठी स्वतंत्र परवान्याची आवश्यकता लागणार नाही.

ही सवलत अनलॉक -4 मध्ये देण्यात आली होती अनलॉक -4 मध्ये, थिएटर, शाळा, राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांना अटीसह सूट देण्यात आली होती. स्विमिंग पूल बंदच राहणार आहेत. काही राज्यांमध्ये मंदिरं खुली करण्यात आली आहेत.

त्याचबरोबर शाळा सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. मात्र महाराष्ट्रात सरकारने मंदिरं सुरू करण्याला अजुनही परवानगी दिलेली नाही. नागरीकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहनही सरकारने केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका टळलेला नाही असंही सरकारने म्हटलं आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News