अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या संकटावर हळूहळू मात करत सर्व उद्योग व्यवसाय; काम धंदे पुर्वव्रत होत आहे. यातच परतीच्या पावसाचा प्रकोप कमी झाला असता बळीराजाने देखील शेतीचे कामे सुरु केली आहे.
शेतकर्यांनी पेरण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यातच कृषी विभागाने आतापर्यंत रब्बी हंगामासाठी १३ हजार ५३१ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले आहे.
यात ७ हजार ६४ क्विंटल सार्वजनिक कंपन्यांनी तर ६ हजार ४६७ खासगी कंपन्यांच्या बियाणांचा समावेश आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी साडे सात लाखांच्या जवळपास सरासरी क्षेत्र आहे.
यंदा अतिरिक्त पावसामुळे हंगामातील पेरण्यांना उशीर होताना दिसत आहे. दुसरीकडे कृषी विभागाने जिल्ह्यात खते आणि बियाणे यांची कमतरता पडू नये, यासाठी नियोजन केले आहे.
हंगामासाठी कृषी विभागाने ४५ हजार क्विंटल बियाणांची मागणी सरकारकडे केली आहे. यातील १३ हजार ५३१ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved