चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावताना ‘या’ चुका टाळाच, फायद्याऐवजी होतील मोठे दुष्परिणाम!

Published on -

आपल्यातील अनेकांना सुंदर आणि तजेलदार त्वचा हवी असते, आणि त्यासाठी आपण घरगुती उपायांवर भर देतो. कोरफड ही अशीच एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे, जिला आपल्याकडे सौंदर्याचं गुपित मानलं जातं. त्वचेला थंडावा देणारी, जळजळ कमी करणारी आणि ओलावा टिकवणारी ही वनस्पती त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. पण जसं एखादं औषध योग्य प्रकारे घेतलं नाही तर ते हानिकारक ठरू शकतं, तसंच कोरफडीचंही आहे. तिचा चुकीचा वापर केल्यास चेहऱ्यावर परिणाम उलट दिसू लागतात.

जास्त वेळ जेल लावू नका

अनेकजण कोरफडीचा उपयोग रात्री झोपताना करतात आणि ती रात्रभर चेहऱ्यावर ठेवतात. पण यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा शोषून घेतला जाऊ शकतो आणि त्वचा कोरडी व खडबडीत होण्याची शक्यता वाढते. कोरफड चेहऱ्यावर फारतर 10 ते 15मिनिटांसाठीच ठेवणं योग्य असतं. त्यानंतर ती नीट धुऊन टाकणं आवश्यक असतं.

टेस्ट करून पाहा

तसंच, कोरफडीचा गर लावण्यापूर्वी ती अगोदर हाताच्या किंवा कानाच्या मागच्या भागावर लावून पाहणं खूप गरजेचं असतं. कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. काहींना कोरफड सूट होत नाही आणि अचानक चेहऱ्यावर ती लावल्यास पुरळ, खाज, किंवा चटकेही बसू शकतात.

सूर्यप्रकाशात जाणे टाळा

कोरफड लावल्यानंतर लगेचच सूर्यप्रकाशात बाहेर जाणंही त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतं. यामुळे त्वचा अधिक संवेदनशील होते आणि सूर्यप्रकाशात ती जळजळीत होऊ शकते, तसेच त्वचेवर डाग पडण्याचा धोका असतो.

काही लोक कोरफडीचा वापर रोजच्या सौंदर्य दिनक्रमात करतात. पण हे सगळ्यांसाठी योग्यच ठरेल असं नाही. काहींच्या त्वचेला वारंवार कोरफड लावल्याने ती अधिक कोरडी आणि निस्तेज होऊ शकते. विशेषतः भेसळयुक्त किंवा सस्ती उत्पादने वापरल्यास हा धोका अधिक वाढतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!