फक्त 5 मिनिटे आधी शरीर करतं सावध, हार्ट अटॅकची लक्षणं कशी ओळखाल? तुमचा जीव वाचवणारी माहिती वाचाच!

Published on -

आजकालच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत, शरीर किती थकले आहे किंवा कोणत्या आजाराची चाहूल देत आहे, हे लक्षात घ्यायला आपण अनेकदा उशीर करतो. त्यातही हृदयविकाराचा झटका ही अशी घटना आहे जी केवळ काही मिनिटांत जीवावर बेतू शकते. पण जर वेळेत शरीराचे संकेत ओळखले, तर मोठा धोका टाळता येतो. डॉक्टर आणि तज्ज्ञ यांचं एकमत आहे की, हृदयविकाराचा झटका येण्याच्या अगदी काही मिनिटे आधीही शरीर काही महत्त्वाची लक्षणं देतं, पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो.

आपल्या चुकीच्या आहारपद्धती, कमी हालचाल, ताणतणाव आणि झोपेच्या असमतोलामुळे हृदयविकाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पूर्वी ज्या आजारांना केवळ वृद्धांशी संबंधित समजलं जायचं, ते आज 30 च्या आतल्या तरुणांनाही घेरू लागले आहे. हृदयविकार हा शांतपणे, आतून चालणारा धोका आहे. पण या झटक्याआधीच, शरीर आपल्याला काही संकेत देतं आणि त्यांची वेळेत ओळख करणे, हीच खरी सावधगिरी ठरते.

छातीत दुखणे

 

सर्वात ठळक लक्षण म्हणजे छातीत येणारा वेदनादायक दाब. काही लोकांना जणू एखादं वजन छातीवर ठेवलं आहे, असं वाटतं. हा दाब मानेपर्यंत, खांद्यांपर्यंत आणि हातात पसरतो. यासोबतच श्वास घेणं कठीण होणं, हृदय धडधडू लागणं ही लक्षणं सहसा झटक्याच्या काही मिनिटे आधी दिसतात. अनेकदा आपण त्याला गॅस किंवा अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करतो पण ही चूक जीवावरही बेतू शकते.

अचानक थंड घाम फुटणे

दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे अचानक थंड घाम फुटणे. एसीमध्ये बसलेले असूनही घाम येत असेल तर हा शरीराचा एक गंभीर इशारा असतो. यासोबतच जबड्यापासून पाठीपर्यंत, मान आणि डाव्या हातात असह्य वेदना जाणवू शकतात. काहींना त्याच वेळी मळमळ, उलटी किंवा गॅसची तीव्र भावना होते, जी आपण गॅस किंवा अपचन समजतो, पण खरंतर ती हृदयाची मदतीसाठीची हाक असते.

चक्कर आल्यासारखं वाटणं

अगदी झटक्याच्या काही क्षण आधी, काही रुग्णांना चक्कर आल्यासारखं वाटतं, किंवा बेशुद्ध पडावं इतकी कमजोरी येते. डोळ्यांसमोर अंधारी येते, चालनं कठीण होतं आणि जर हे सर्व एकत्रितपणे होत असेल, तर विलंब न करता डॉक्टरांकडे जाणं हाच एकमेव पर्याय असतो.

हृदयविकाराचं हे संकट कुठल्याही वयात, कोणत्याही क्षणी येऊ शकतं. त्यामुळे फक्त वयस्कर लोकच नाही, तर तरुणांनीही आपली जीवनशैली तपासून पाहणं आणि हृदयाच्या सूचनांकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!