Maharashtra Railway : तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन आहे का? मग तुमच्यासाठी रेल्वेकडून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वेने तिरुपती बालाजीला दर्शनाला जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी एक नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा केली आहे.
ही गाडी मराठवाड्यातून चालवले जाणार आहे आणि यामुळे मराठवाड्यातील भाविकांसाठी तिरुपती बालाजीला जाणे सोयीचे होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे कडून जालना ते तिरुपती यादरम्यान नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे आणि आज आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जालना ते तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक कसे असणार ?
मिळालेल्या माहितीनुसार जालना ते तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन सात जुलै 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत चालवली जाणार आहे. ही गाडी या काळात दर सोमवारी जालना मधून रवाना होणार आहे आणि मंगळवारी तिरुपतीला पोहोचेल.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दर सोमवारी सकाळी 7 वाजता ही गाडी जालना रेल्वे स्थानकावरून सोडले जाणार आहे आणि मंगळवारी सकाळी 10.45 वाजता तिरुपतीला पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळवारी तिरुपती येथून सोडली जाणार आहे आणि बुधवारी ही गाडी जालनाला पोहोचेल.
तिरुपती येथून मंगळवारी दुपारी 3.15 वाजता सोडली जाणार आहे आणि बुधवारी दुपारी 3.50 वाजता जालन्यात पोहोचणार आहे. अर्थातच मराठवाड्यातील तिरुपती बालाजीच्या भक्तांना 3 दिवसांत तिरुपतीचे दर्शन करता येणार आहे.
कोण – कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार विशेष एक्सप्रेस ट्रेन
जालना – तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन (07609/07610) या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीला या मार्गावरील परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, विकाराबाद,
लिंगमपल्ली, गुटूर गुडूर, रेनीगुंटा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. नक्कीच या नव्या एक्सप्रेस ट्रेनमुळे मराठवाड्यातील या संबंधित रेल्वे स्थानकावरून तिरुपती बालाजीला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अवघ्या तीन दिवसात मराठवाड्यातील भाविकांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल आणि रिटर्न पुन्हा एकदा आपल्या घरी जाता येणार आहे.