पाठदुखी, अपचन आणि लठ्ठपणावरील जादुई उपाय! रोज सकाळी फक्त 5 मिनिटे करा ‘हे’ योगासन, आणि पाहा कमाल

Published on -

आपल्या शरीरात एखादी गोष्ट सतत त्रास देत असेल, जसं की पाठदुखी, अपचन किंवा थकवा तर त्यावर कायमस्वरूपी आणि नैसर्गिक उपाय शोधणं आवश्यक ठरतं. यासाठी योगासारखं दुसरं काही नाही. रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपल्याला ताजेतवाने, शांत आणि फिट ठेवण्यासाठी काही योगासने खूपच प्रभावी ठरतात. त्यातलं एक म्हणजे भेकासनज्याला ‘बेडूक पोझ’ असंही म्हणतात.

भेकासनचे फायदे

भेकासन केवळ एक आसन नाही, तर शरीर आणि मन यांचं संतुलन साधणारं प्रभावी साधन आहे. अनेकदा आपण तासन्‌तास एका जागी बसून काम करतो. त्यामुळे पाठ, कंबर, मांड्या आणि गुडघे यावर ताण येतो. अशावेळी भेकासन शरीराला लवचिकता देतं आणि स्नायूंना नवसंजीवनी देतं. यामुळे चालताना किंवा रोजच्या हालचालींमध्ये सहजता वाटते आणि जडपणाचा अनुभव कमी होतो.

भेकासनाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते पोटावर दाब निर्माण करतं. त्यामुळे पचनसंस्था अधिक चांगली काम करते. गॅस, बद्धकोष्ठता किंवा अपचनासारख्या समस्यांपासून हळूहळू मुक्ती मिळते. शरीर हलकं वाटतं आणि अन्न लवकर पचतं. याचा थेट परिणाम म्हणजे उर्जा वाढते आणि थकवा जाणवत नाही.

 

मधुमेह असणाऱ्यांसाठीही फायदेशीर

या आसनाचा प्रभाव केवळ पचनावरच नाही, तर शरीरातील अंतर्गत अवयवांवरही होतो. विशेषतः स्वादुपिंडावर होणाऱ्या दाबामुळे इन्सुलिनच्या पातळीत सुधारणा होते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी हे आसन फार उपयुक्त मानलं जातं. त्याचसोबत अ‍ॅड्रेनल ग्रंथीचे कार्य सुधारल्यामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन राखलं जातं, ज्यामुळे तणाव, चिडचिड कमी होते आणि मूड देखील चांगला राहतो.

श्वासोच्छवासाच्या त्रासांनी ग्रासलेल्यांसाठी भेकासन हे वरदानच आहे. खोल श्वास घेणं, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवणं आणि ऑक्सिजनचं प्रमाण योग्य राखणं हे सगळं या एकाच आसनामुळे शक्य होतं. त्यामुळे दिवसभर मन प्रसन्न आणि शरीर उत्साही राहतं.

जर तुमचं उद्दिष्ट वजन कमी करणं असेल, तरीही भेकासन तुमच्यासाठी योग्य आहे. या आसनामुळे पोट आणि मांड्यांवर विशेष लक्ष केंद्रीत होतं. यामुळे त्या भागातील चरबी हळूहळू कमी होते. शिवाय, कॅलरीज बर्न होण्याचा दर वाढतो आणि शरीर सडपातळ होतं.

काय काळजी घ्याल?`

हे आसन करताना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. श्वासोच्छवास सामान्य ठेवणं, पोट आणि छातीवर योग्य प्रमाणात ताण जाणं आणि शरीर सैल ठेवणं याकडे लक्ष दिल्यास भेकासनाचा संपूर्ण फायदा मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!