ओसवाल पंप्स शेअरने लिस्टिंगनंतर घेतली उसळी! गुंतवणूकीसाठी आहे का योग्य वेळ? पुढे काय होणार?

Published on -

Oswal Pumps Share Listing:- आज शेअर बाजाराच्या सकाळच्या सुरुवातीला एक महत्वाची घडामोड समोर आली व ती म्हणजे ओसवाल पंप्स लिमिटेड या कंपनीचा शेअर बाजारात पहिल्यांदाच प्रवेश झाला. या कंपनीचा मेनबोर्ड IPO आज लिस्ट झाला, पण सुरुवात थोडी सौम्य वाटली. कंपनीचा शेअर NSE वर ३.२ टक्के प्रीमियमसह ६३४ रुपयांवर सूचीबद्ध झाला, तर BSE वर तो थोडा कमी म्हणजे २.९ टक्क्यांच्या प्रीमियमसह ६३२ रुपयांवर उघडला.

या लिस्टिंगकडे अनेक गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं होतं, कारण IPO ओपन होताच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. इश्यू किंमत ६१४ रुपये प्रति शेअर ठरवण्यात आली होती, त्यावर ही सौम्य उडी म्हणजे गुंतवणूकदारांच्या अपेक्षा काही अंशी पूर्ण झाल्याचं चित्र होतं. लिस्टिंगनंतर शेअरने बाजारात हलकासा जोर धरल्याचंही दिसलं. सकाळी १०.४० च्या सुमारास हा शेअर BSE वर ६४० रुपयांवर पोहोचला, म्हणजेच जवळपास ४.१३ टक्क्यांची वाढ. त्याहीपुढे, काही वेळातच हा शेअर ६४९.१५ रुपयांपर्यंत गेला, जो आजच्या दिवशीचा आतापर्यंतचा उच्चांक ठरला.

ओसवाल पंप्सच्या IPO चे स्वरूप कसे होते?

ओसवाल पंप्सचा IPO एकूण १३८७.३४ कोटी रुपयांचा होता. यामध्ये कंपनीने १.४५ कोटी नवीन शेअर्स दिले आणि ऑफर फॉर सेलद्वारे आणखी ८१ लाख शेअर्स बाजारात आणले. IPO मध्ये भाग घेण्यासाठी २४ शेअर्सचा एक लॉट ठेवण्यात आला होता, म्हणजेच किमान गुंतवणूक रक्कम सुमारे १४ हजार रुपये होती.

या IPO ला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद खूपच उत्साहवर्धक होता. तीन दिवसांच्या सबस्क्रिप्शन कालावधीत हा इश्यू तब्बल ३४.४२ पट भरला. यातून रिटेल गुंतवणूकदारांचं विश्वास दिसून आला. त्यांनी सुमारे ३.६० पट बोली लावल्या. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी तर या इश्यूला जबरदस्त प्रतिसाद दिला व त्यांच्या श्रेणीत तो ८८.०८ पट भरला. एनआयआय (नॉन-इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स) गटातही ३६.७० पट सबस्क्रिप्शन नोंदवण्यात आलं.

याआधी १२ जून रोजी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांसाठी IPO खुला केला होता आणि त्यातूनच ४१६.२० कोटी रुपये उभारण्यात कंपनीला यश आलं. IPO यशस्वी करण्यासाठी कंपनीने IIFL, Axis Capital, CLSA India, JM Financial आणि Nuvama Wealth Management यांच्यासारख्या अनुभवी ब्रोकिंग संस्थांना बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नेमलं होतं.

सध्या बाजारात IPO ची चांगली हवा आहे आणि ओसवाल पंप्सने त्यात आपला पहिल पाऊल ठेवलंय. शेअर लिस्टिंगनंतर जरी मोठी उसळी दिसली नाही, तरी दीर्घकालीन गुंतवणूकाच्या दृष्टीने बाजारात या कंपनीकडून काही स्थिर आणि विश्वासार्ह कामगिरीची अपेक्षा ठेवली जात आहे. पुढच्या काही दिवसांत या शेअरची वाटचाल बाजाराच्या एकूण दिशेवर आणि गुंतवणूकदारांच्या भावनांवर अवलंबून असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!