जगभरात अंकशास्त्र या विषयाला एक गूढ आणि रोचक मानलं जातं. जन्मताखेनुसार व्यक्तीमत्व समजून घेतले जाते. यातही 2 क्रमांकाच्या मुलींबद्दल खूप काही बोललं जातं. त्या भावनिक असतात, शांत स्वभावाच्या असतात, पण त्यांचं आर्थिक नशीब मात्र आश्चर्यकारकरित्या मजबूत असतं. त्यांच्या आयुष्यात चंद्राचा प्रभाव असल्याने त्यांची मानसिकता कोमल आणि संवेदनशील असते. पण हेच वैशिष्ट्य त्यांच्या नातेसंबंधांमध्ये काही वेळा अडचणीही निर्माण करतं.

मूलांक 2
ज्यांचा जन्म महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 2 असतो. चंद्राशी संबंधित असल्यामुळे या मुली सहानुभूतीशील, समजूतदार आणि प्रेमळ असतात. त्यांच्या मनात भावनांचा खोल समुद्र असतो. त्या इतरांच्या भावनांना सहज ओळखू शकतात आणि त्यांच्यासाठी वेळ, मदत आणि समर्पण देण्याची तयारी ठेवतात. पण त्यांच्या या कोमलतेला सहकार्य न मिळाल्यास त्या दुखावतात आणि नकळत स्वतःच वेगळं होतात.
या मुलींच्या आर्थिक जीवनात मात्र एक वेगळंच सामर्थ्य दिसून येतं. जणू काही धनलक्ष्मी आणि कुबेर यांच्या आशीर्वादाने त्या पैशाकडे खेचल्या जातात. त्या खर्च करायला मागे पुढे पाहत नाहीत, पण त्याचवेळी बचतीच्या सवयीने त्या आर्थिकदृष्ट्या स्वतःला स्थिर ठेवतात. एखादं कलात्मक क्षेत्र, लेखन, फॅशन, शिक्षण किंवा समुपदेशन हे सगळं त्यांच्या स्वभावाशी सुसंगत असतं. त्या ज्या क्षेत्रात जातात, तिथे आपली छाप सोडतात.
‘या’ मूलांकसोबत फुलते वैवाहिक जीवन
मात्र, लग्नाच्या बाबतीत त्यांच्या नशिबाने थोडासा खेळ खेळलेला दिसतो. 2 क्रमांकाच्या मुली 1 क्रमांकाच्या मुलांशी उत्तम जुळतात. दोघांमधला भावनिक समतोल, एकमेकांवरचा विश्वास आणि संयम या नात्याला बळकटी देतो. 3 आणि 6 क्रमांकाच्या मुलांशीसुद्धा त्यांचे संबंध चांगले राहतात. पण 5, 8 आणि 9 क्रमांकाच्या मुलांशी नातं फारसं जमत नाही. एकमेकांचे स्वभाव, विचार आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी यात फार मोठा फरक असल्यामुळे नातं टिकण्याऐवजी तोडीकडे झुकतं.
अशा मुली घरात शांतता राखतात. त्या कधीच आरडाओरड करत नाहीत, उलट वाद टाळतात. त्या सासरच्या मंडळींसोबतही चांगले संबंध ठेवतात, त्यामुळे सासू-सासरे त्यांना आपल्या मुलीप्रमाणे मानतात. त्यांच्या शांत आणि समंजस स्वभावामुळे घरात गोडवा टिकतो.
विशेष उपाय
मनातील अस्थिरतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ध्यान, योग आणि अध्यात्माकडे वळतात. चंद्राच्या प्रभावाला सौम्य करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करणं, चांदीचं ब्रेसलेट घालणं, पांढरे कपडे परिधान करणं यांसारख्या सवयी त्या अंगिकारतात.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की, 2 क्रमांकाच्या मुली या बाहेरून शांत आणि गोंडस भासत असल्या तरी त्यांचं अंतरंग अतिशय गहन आणि भावपूर्ण असतं. त्यांचं आयुष्य सुंदर असतं, पण त्यांच्याशी नातं जोडताना त्यांच्या भावनिक गरजांनाही समजून घेणं तितकंच आवश्यक असतं. कारण त्यांच्या प्रेमात, विश्वासात आणि समर्पणात खरं सौंदर्य दडलंय.