आजच्या घाईच्या जगात वारंवार रिचार्ज करण्यापेक्षा एकदाच रिचार्ज करून वर्षभर तणावमुक्त राहणे हे अनेकांचे स्वप्न असते. याच गरजेला लक्षात घेऊन Airtel, Vi, BSNL आणि Jio यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी एकाहून एक उत्तम वार्षिक प्रीपेड प्लॅन्स सादर केले आहेत. काही प्लॅन्स फक्त 5 रुपयांपेक्षा कमी दररोज खर्चात 365 दिवसांची वैधता देतात. चला पाहूया कोणता प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
Airtel चे बेस्ट प्लॅन्स

Airtel चा 1,849 रुपयांचा प्लॅन केवळ कॉल आणि SMS साठी आहे. यात इंटरनेट डेटा नाही, मात्र अमर्यादित कॉलिंगसह एकूण 3,600 SMS मिळतात. याचा दररोजचा खर्च फक्त 5 रुपये येतो. यात Hello Tunes आणि स्पॅम अलर्टसारखे अतिरिक्त फायदे देखील आहेत. जर तुम्हाला इंटरनेटची गरज कमी असेल आणि कॉलिंग मुख्य आहे, तर हा प्लॅन परवडतो.
Airtel चाच दुसरा प्लॅन 2,249 रुपयांना उपलब्ध आहे. यात 365 दिवस वैधता, एकूण 30GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 3,600 SMS मिळतात. याची दररोजची किंमत साधारणपणे 6 रुपये आहे. थोड्या फार इंटरनेटसोबत कॉलिंग आवश्यक असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
Vi चे बेस्ट प्लॅन्स
Vi म्हणजेच Vodafone Idea कडूनही 1,849 रुपयांचा प्लॅन येतो, जो Airtel प्रमाणे फक्त कॉल आणि SMS पुरवतो. यातही 3,600 SMS आणि अमर्यादित कॉलिंग मिळते. दिवसागणिक खर्च फक्त 5 रुपये.
Vi कडून आणखी एक पर्याय म्हणजे 1,999 रुपयांचा प्लॅन, ज्यामध्ये एकूण 24GB डेटा, कॉलिंग आणि 3,600 SMS मिळतात. दररोजचा खर्च साधारणतः 5.5 रुपये होतो. फारसा डेटा वापरत नसणाऱ्यांसाठी हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो.
BSNL चे प्लॅन्स
BSNL चा 1,999 रुपयांचा प्लॅन मात्र डेटा-लव्हर्ससाठी खास आहे. यात संपूर्ण वर्षासाठी 600GB डेटा मिळतो आणि दररोज 100 SMS तसेच अमर्यादित कॉलिंगही असते. याचा रोजचा खर्च जवळपास 5.4 रुपये होतो. ग्रामीण भागातील वापरकर्त्यांसाठी हा प्लॅन चांगला पर्याय आहे.
Jio चा प्लॅन
शेवटी, Jio चा सगळ्यात महाग आणि शक्तिशाली प्लॅन 3,599 रुपयांना येतो. यात दररोज 2.5GB डेटा, 100 SMS आणि अमर्यादित कॉलिंगसह Jio TV, Jio Cinema आणि AI Cloud सेवा देखील मिळतात. या प्लॅनचा दररोजचा खर्च जवळपास 9 रुपये आहे, मात्र जास्त डेटा आणि मनोरंजन सेवा हवे असलेल्यांसाठी हा प्लॅन परफेक्ट ठरतो.
थोडक्यात सांगायचं झालं, तर तुम्ही कॉल आणि SMS वर लक्ष केंद्रित करत असाल तर Airtel किंवा Vi चा 1,849 रुपयांचा प्लॅन उत्तम. जर डेटा देखील हवा असेल तर BSNL किंवा Jio चा प्लॅन विचारात घेता येईल.