केतू ग्रहाच्या प्रभावाखाली जन्मलेले ‘हे’ लोक आयुष्यात कधीच पराभूत होत नाहीत; जाणून घ्या यांचा मूलांक

अंकशास्त्र ही एक अशी शास्त्रशाखा आहे जी जन्मतारखेवरून व्यक्तीच्या स्वभावाचे, आयुष्याच्या वळणांचे आणि त्याच्या नशिबाचे अनेक पैलू उलगडून दाखवते. प्रत्येक अंकाला एक विशिष्ट ग्रह अधिपत्य देतो आणि तो ग्रह त्या व्यक्तीच्या जीवनावर ठसा उमटवतो. या सगळ्यात 7 हा एक असा अंक आहे जो सर्वसामान्य नाही. त्याचे व्यक्तिमत्त्व, विचारसरणी आणि जीवन जगण्याची पद्धत इतरांपेक्षा खूप वेगळी असते.

 

मूलांक 7

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला असतो, त्यांचा मूलांक 7 असतो. अंकशास्त्रानुसार, या अंकावर केतू ग्रहाचा प्रभाव असतो, जो स्वभावाने रहस्यमय आणि अंतर्मुख बनवणारा आहे. या अंकाचे लोक अनेक वेळा शांत, गंभीर आणि स्वतःच्या विश्वात रमलेले असतात. पण खरी गंमत अशी की ते कितीही तणावात असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर त्याचा लवलेशही दिसत नाही.

7 क्रमांकाच्या लोकांची एक खासियत म्हणजे ते कोणत्याही कठीण प्रसंगाला किंवा अडचणीला कधीही घाबरत नाहीत. ते नेहमी हसतमुखाने जीवनातील संकटांना सामोरे जातात. ते कुटुंबासाठी एक प्रकारचे आधारस्तंभ असतात आणि त्यांच्या सकारात्मकतेमुळे इतरांनाही धैर्य मिळते.

मूलांक 7 चे गुण आणि स्वभाव

या अंकाच्या लोकांमध्ये एक खास अंतर्ज्ञान शक्ती असते. त्यांच्या निर्णयांचा आधार नेहमीच हृदय असतो, मेंदू नाही. केतू या ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे त्यांची विचारशक्ती केवळ तार्किक नसून भावनिक देखील असते. म्हणूनच ते अनेकदा भविष्यातील गोष्टींचा अचूक अंदाज लावतात. त्यांच्या मनात जे विचार येतात, ते अनेकदा वास्तवात घडतं आणि हाच त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा भाग ठरतो.

अर्थात, या व्यक्तींना समजणे फार सोपे नसते. त्यांचा स्वभाव आणि अंतर्गत भावना त्यांनी इतक्या कौशल्याने लपवलेले असतात की अनेकदा जवळच्या लोकांनाही ते समजत नाहीत. त्यांच्या हास्याच्या आड काहीतरी चाललंय हे ओळखणं फार जड जातं. पण तरीही हे लोक समाजात एक विशेष स्थान निर्माण करतात, कारण त्यांची मौलिकता आणि आत्मभान साऱ्यांना भावतं.

अंकशास्त्रानुसार, 7 हा अंक खरोखरच भाग्याचा मानला जातो. अशा लोकांच्या आयुष्यात संघर्ष असला तरी त्यांचा आत्मा कधीही हरत नाही. ते संकटांचा सामना करत राहतात, आणि त्यातूनच एक नवे यश जन्माला येते.