महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ 174 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी, कुठून कुठपर्यंत जाणार नवा मार्ग?

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी खानदेश आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. जळगाव, जालना आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे.

Published on -

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास आहे कारण की रेल्वे मंत्रालयाकडून गेल्यावर्षी एका महत्त्वाच्या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे.

खरेतर, जालना ते जळगाव दरम्यानच्या रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून ऑगस्ट 2024 मध्ये मंजुरी मिळाली आहे. दरम्यान याच रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या संदर्भात आता एक नवीन माहिती हाती आली आहे.

कसा असणार नवा मार्ग?

जळगाव जालना रेल्वे मार्ग 174 किलोमीटर लांबीचा राहणार असून या रेल्वे मार्गाला 10 ऑगस्ट 2024 मध्ये रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. महत्त्वाची बाब अशी की, या जळगाव – जालना रेल्वे लाईन साठी जालना महसूल प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे.

पण, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात रेल्वे लाईन साठी भूसंपादन करताना अडचणी येत आहेत. भूसंपादन प्रक्रियेसाठी तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत आणि परिणामी रेल्वेमार्ग निश्चत करण्यात रेल्वे प्रशासनापुढेही अडचणी येत आहेत.

दरम्यान, या रेल्वे मार्गाचा प्रशासनाने प्राथमिक स्वरूपाचा आराखडा सुद्धा तयार केला आहे. खरंतर जळगाव जालना रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर हा रेल्वे मार्ग नेमका कसा असेल,

कोणत्या भागातून जाणार, उत्तर महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील कोणते जिल्हे यामुळे कनेक्ट होणार? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केले जात होते आणि आता अखेर कार हा रेल्वे मार्ग प्रकल्प नेमका कसा असेल, याचा मार्ग कसा असेल याची माहिती समोर आली आहे.

या मार्गावर किती स्टेशन तयार होणार 

मीडिया रिपोर्टनुसार जळगाव जालना रेल्वे मार्ग प्रकल्प जळगाव, नशिराबाद, अजिंठा, सिल्लोडमार्गे जालना असा विकसित केला जाईल अशी शक्यता आहे. या 174 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर 19 रेल्वे स्टेशन, 3 नद्यांवर मोठे पूल, 130 छोटे पूल, 3 बोगदे विकसित केले जाणार आहेत.

जळगाव, नशिराबाद, धानवड, नेरी, सुनसगाव बुद्रुक, पहूर, वाकोद, अजिंठा लेणी, अन्वी, सिल्लोड, भोकरदन, सोयगाव, केदारखेडा, राजूर, बावने पांगरी, पिंपळगाव, नागेवाडी,

दिना गाव व जालना ही या मार्गावरील रेल्वे स्टेशन राहणार आहेत. या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी 935 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. तसेच यासाठी 7,106 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!