फॅट कमी करण्यासाठी धावणं सोडा! ट्रेडमिलवर ‘अशा’ पद्धतीने चालल्यासही वजन होईल कमी

Published on -

वाढती वजनाची समस्या आणि शरीरावर साठलेली चरबी कमी करण्यासाठी अनेकजण दिवसाचे काही तास ट्रेडमिलवर घालवतात. पण आजही अनेकांना हा प्रश्न पडतो, ट्रेडमिलवर जलद धावावे का? की झुकलेल्या ट्रेडमिलवर मध्यम वेगाने चालणे अधिक फायदेशीर ठरेल? याच प्रश्नावर अलीकडेच एक अभ्यास करण्यात आला आणि त्यातून जे निष्कर्ष समोर आले ते खरंच आश्चर्यचकित करणारे आहेत.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ एक्सरसाइज सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात संशोधकांनी ट्रेडमिलवर झुकून चालणे आणि सरळ पृष्ठभागावर धावणे याची थेट तुलना केली. अभ्यासात 16 जणांचा सहभाग होता. त्यात पुरुष आणि महिलांचा समावेश होता. संशोधकांनी सहभागींचा दोन गटांमध्ये विभाग केला. पहिला गट ट्रेडमिलवर 12 अंश झुकाव ठेवून, दर तासाला 3 किलोमीटर या वेगाने सलग 30 मिनिटे चालला, तर दुसऱ्या गटातील लोकांनी सरळ पृष्ठभागावर वेगाने धावण्याचा व्यायाम केला.

ट्रेडमिलवर झुकून चालण्याचे फायदे

या प्रयोगादरम्यान, कोणालाही ट्रेडमिलची रेलिंग पकडण्याची परवानगी नव्हती आणि सर्वांनी त्यांच्या नैसर्गिक गतीनुसार धावणे किंवा चालणे केले. उद्देश होता, कोणत्या पद्धतीत शरीर जास्त चरबी जाळते हे जाणून घेणे. संशोधकांना जेव्हा निकाल मिळाले, तेव्हा त्यांनी पाहिले की झुकलेल्या ट्रेडमिलवर चालणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या एकूण बर्न केलेल्या कॅलरीपैकी 40 टक्के अतिरिक्त चरबीमधून घेतल्या. तुलनेत, धावणाऱ्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण फक्त 33 टक्के होते.

याचा अर्थ स्पष्ट आहे, ट्रेडमिलवर झुकाव ठेवून चालणे, हे केवळ सांधांवर कमी दाब टाकतेच, पण शरीरात साठलेल्या चरबीवर थेट परिणाम करते. व्यायामाचे हे स्वरूप शरीराला उर्जेसाठी चरबीचा जास्त उपयोग करायला भाग पाडते. विशेषतः वजन कमी करायचं असेल आणि चरबी लक्ष्यावर ठेवायची असेल, तर ट्रेडमिलवर चालण्याची ही पद्धत अधिक फायदेशीर ठरते.

12-3-30 पद्धत काय?

संपूर्ण अभ्यास 7 दिवस चालला आणि त्यात ’12-3-30′ ही चालण्याची पद्धत म्हणजे 12 टक्के झुकाव, 3 किलोमीटर प्रतितास वेग आणि 30 मिनिटांची चाल विशेष प्रभावी ठरली. त्यामुळे, जे लोक जिममध्ये ट्रेडमिलचा उपयोग फक्त धावण्यासाठी करतात, त्यांनी आता झुकून चालण्याचाही विचार करायला हवा.

महत्त्वाचं म्हणजे, हा अभ्यास केवळ एक वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शवतो. प्रत्येकाचा शरीराचा प्रकार वेगळा असतो, म्हणून कोणताही व्यायाम पद्धतशीर आणि वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच करावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!