‘हे’ आहे देशातील पहिले मेडिकल कॉलेज ! MBBS ची फी फक्त 40 हजार रुपये

वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवायचे असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की, आज आपण देशातील सर्वाधिक जुन्या मेडिकल कॉलेजची माहिती पाहणार आहोत. 

Published on -

India’s First Medical College : बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी मेडिकल आणि इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेतात. दरम्यान जर तुम्हाला ही वैद्यकीय महाविद्यालयात ऍडमिशन घ्यायचे असेल आणि तुम्हीही NEET UG मध्ये चांगले गुण मिळवले असतील तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे.

खरेतर, NEET UG 2025 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे आणि आता यात चांगले गुण मिळवलेले उमेदवार कौन्सिलिंगची वाट पाहत आहेत. महत्त्वाची बाब अशी की NMC कडून लवकरच कौन्सिलिंगचे  वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

खरंतर शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मध्ये एमबीबीएस साठी एकूण एक लाख 18 हजार 190 जागा उपलब्ध आहेत. या जागा देशभरातील सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आहेत.

आज देशभरात हजारो वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध आहेत पण तुम्हाला देशातील पहिले मेडिकल कॉलेज कोणते होते याची माहिती आहे का ? नाही ना, मग आज आपण याच संदर्भात माहिती पाहणार आहोत.

आज आपण देशातील एका अशा मेडिकल कॉलेजची माहिती पाहणार आहोत ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अवघ्या 40 हजार रुपयांमध्ये एमबीबीएसचा कोर्स करता येणार आहे. त्याहून महत्त्वाची बाब अशी की हे देशातील पहिले मेडिकल कॉलेज आहे. 

हे आहे भारतातील पहिले मेडिकल कॉलेज 

पश्चिम बंगाल राज्याच्या कोलकाता मधील मेडिकल कॉलेज हे देशातील सर्वात जुने वैद्यकीय महाविद्यालय असल्याचा दावा केला जातो. हे भारतातील पहिले मेडिकल कॉलेज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या महाविद्यालयाची स्थापना जानेवारी 1835 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून करण्यात आली. ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी भारतात आधुनिक अ‍ॅलोपॅथिक वैद्यकीय शिक्षण सुरू करण्याच्या उद्देशाने या कॉलेजची स्थापना केली होती.

या महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचमध्ये बंगाल, बिहार आणि उत्तर भारतातील 20 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. भारतातील पहिल्या महिला डॉक्टरांपैकी एक असलेल्या कादंबिनी गांगुली यांनी 1886 मध्ये या कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

फी किती आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार या कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या एकूण 250 सीट्स उपलब्ध आहेत. यापैकी 15 टक्के म्हणजे जवळपास 38 सीट्स या ऑल इंडिया कोट्यासाठी उपलब्ध आहेत आणि उर्वरित सीट्स राज्याच्या कोट्यासाठी उपलब्ध आहेत.

कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एकूण शिक्षण शुल्क 40 हजार 500 रुपये इतके आहे आणि वसतिगृह शुल्क 648 रुपये प्रतिवर्ष इतके आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!