दैनंदिन आयुष्यात आपण कित्येक वेळा घड्याळाकडे पाहतो. सकाळी उठल्यावर, ऑफिसला जाताना, लंचच्या वेळेस, संध्याकाळी…घड्याळाशिवाय दिवस पुढे सरकतच नाही. पण डिजिटल घड्याळामध्ये वेळेसमोर जे दोन छोटे अक्षरं दिसतात AM आणि PM त्यांचा खरा अर्थ तुम्हाला माहित आहे का? जरी आपल्याला ही संज्ञा नेहमीच दिसते, तरीही अनेक लोक अजूनही त्यांच्या बरोबर अर्थाबाबत गोंधळलेले असतात.

AM आणि PM चा अर्थ
बहुतेक लोक असं समजतात की AM म्हणजे सकाळ आणि PM म्हणजे संध्याकाळ किंवा रात्र. पण खरे पाहता ही माहिती अर्धवट आहे. ही दोन संज्ञा मूळ लॅटिन भाषेतून आलेल्या आहेत. AM म्हणजे Ante Meridiem, ज्याचा अर्थ आहे “दुपारपूर्वी” आणि PM म्हणजे Post Meridiem, म्हणजेच “दुपारनंतर”. याचा अर्थ असा की AM हा वेळ रात्री 12 पासून ते दुपारी 12 पर्यंत असतो, तर PM हा वेळ दुपारी 12 पासून ते मध्यरात्री 12 पर्यंत असतो.
उदाहरणार्थ, सकाळी 6 वाजले असतील तर तो 6:00 AM, आणि संध्याकाळी 6 वाजले असतील तर तो 6:00 PM. पण लोकांमध्ये एक मोठा गैरसमज असा आहे की 12:00 AM म्हणजे दुपार आणि 12:00 PM म्हणजे मध्यरात्र. प्रत्यक्षात हे उलटे आहे. 12:00 AM म्हणजे मध्यरात्र आणि 12:00 PM म्हणजे अगदी दुपारचे 12.
प्राचीन रोमन काळातील पद्धत
अशा प्रकारे वेळ मोजण्याची पद्धत प्राचीन रोमन काळापासून सुरू झाली. त्या काळी सूर्याच्या स्थितीवरून दिवसाचा वेग मोजला जायचा. “Meridiem” हा शब्द म्हणजे दिवसाचा मधला भाग म्हणजे दुपार. त्यामुळे त्याच्या आधीचा काळ म्हणजे Ante Meridiem (AM) आणि नंतरचा काळ म्हणजे Post Meridiem (PM).
आज जरी 24-तासांची वेळ मोजण्याची प्रणाली अस्तित्वात असली (जसे 13:00, 14:00 वगैरे), तरीही 12-तासांची AM/PM प्रणाली आपल्याला रोजच्या जीवनात अधिक सोपी वाटते. पण ही सोपी वाटणारी प्रणालीही समजून घेतल्यावर आणखी सोपी होते.