भारतात आली सर्वात स्वस्त लक्झरी 7-सीटर SUV, डिझाईन आणि पॉवरट्रेन पाहून फॉर्च्युनरला विसराल!

Published on -

भारतीय बाजारात लक्झरी SUV खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जे ग्राहक सात जणांना आरामात बसवणारी, तिसऱ्या रोमध्येही भरपूर जागा देणारी आणि सगळ्याच बाबतीत ‘लक्झरी’चा अनुभव देणारी SUV शोधत होते, त्यांच्यासाठी आता एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. ऑडीने आपली सर्वात स्वस्त, पण अत्यंत प्रीमियम 7-सीटर लक्झरी SUV Audi Q7 Signature Edition भारतात सादर केली आहे.

ऑडी Q7 ही SUV आधीपासूनच भारतातील लक्झरी SUV चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण आता ‘Signature Edition’ या विशेष ट्रिमसह, ऑडीने या गाडीचा अनुभव अधिक खास बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ही गाडी Q7 च्या टेक्नॉलॉजी व्हेरिएंटवर आधारित असून त्यामध्ये काही नवीन डिझाइन अपडेट्स आणि खास अ‍ॅक्सेसरीजचा समावेश आहे. डॅशकॅम, इन-कॅबिन एस्प्रेसो मेकरसारख्या अ‍ॅक्सेसरीजसह, ही गाडी फक्त एक ट्रान्सपोर्ट व्हेईकल न राहता, पूर्णपणे एक आलिशान चालतं घर वाटते.

या नवीन एडिशनमध्ये तुम्हाला एक स्टायलिश पडल लॅम्प मिळतो ज्यावर ऑडीचा लोगो झळकतो. यासोबत 20-इंच ब्लॅक अलॉय व्हील्स, स्टेनलेस स्टीलचे पेडल कव्हर्स आणि मेटॅलिक की फोब कव्हरसारखी डिटेल्स ही गाडी आणखी खास बनवतात. शिवाय, सिग्नेचर एडिशनमध्ये पाच अनोख्या पेंट शेड्सही मिळतात. जसे की, सखीर गोल्ड (Sakhir Gold), मायथोस ब्लॅक (Mythos Black), वेटोमो ब्लू (Waitomo Blue ) आणि Samurai Grey जे तिची रस्त्यावरची उपस्थिती अधिकच प्रभावी करतात.

फीचर्स आणि इंजिन

तांत्रिक बाबतीत, ऑडी Q7 Signature Edition मध्ये 3.0 लिटर V6 टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे जे तब्बल 340 bhp आणि 500 Nm टॉर्क तयार करतं. ही गाडी 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह क्वाट्रो ऑल-व्हील ड्राईव्ह सिस्टममध्ये येते, जी तीव्र वेगात सुद्धा जबरदस्त स्टेबिलिटी आणि नियंत्रण देते. इनसाइड, बँग अँड ओलुफसेनची 3D साउंड सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, लेदर-रॅप्ड डॅशबोर्ड आणि दोन स्क्रीनचा इन्फोटेनमेंट सिस्टम ही Q7 ला इतर SUV पेक्षा वेगळी ओळख देतात.

किंमत किती?

ऑन-रोड मुंबई किंमत पाहता, Signature Edition ची किंमत ₹1.19 कोटी आहे. सामान्य Q7 च्या तुलनेत थोडी महाग असली तरी, BMW X7 किंवा Mercedes GLS सारख्या स्पर्धकांच्या तुलनेत ही SUV अजूनही तुलनेनं परवडणारी वाटते. विशेष म्हणजे, Q7 ही केवळ स्टेटस सिम्बॉल नाही तर ती प्रत्यक्षातही एक अत्यंत प्रॅक्टिकल, प्रशस्त आणि आरामदायक लक्झरी SUV आहे.

जे खरेदीदार परवडणाऱ्या किंमतीत लक्झरी, पॉवर, टेक्नॉलॉजी आणि सात जणांना आरामदायी जागा देणारी SUV शोधत होते, त्यांच्यासाठी ऑडी Q7 Signature Edition एक योग्य पर्याय ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!