Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मधील सुट्ट्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. या यादीनुसार या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांना एकूण 128 दिवस सुट्ट्या राहणार आहे.
यामध्ये 52 रविवार आणि इतर 76 सुट्ट्या राहणार आहेत. इतर 76 सुट्ट्यांमध्ये दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्या समाविष्ट आहेत. दिवाळी आणि उन्हाळी काळात एकूण 48 दिवस सुट्ट्या राहणार आहेत.

अशा परिस्थितीत आता आपण शैक्षणिक वर्ष 2025 26 मधील राज्यातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार म्हणजे कोणत्या महिन्यात किती सुट्ट्या राहणार याची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.
कोणत्या महिन्यात किती सुट्ट्या राहणार?
जुलै महिन्यात आषाढी एकादशी, मोहरम आणि नागपंचमी अशा एकूण तीन सुट्ट्या राहणार आहेत. ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन आणि गणेश चतुर्थी निमित्ताने शाळांना सुट्टी राहणार आहे.
सप्टेंबर महिन्यात गौरी विसर्जन, ईद-ए- मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना हे चार दिवस सुट्टीचे राहतील. ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती आणि दसऱ्यानिमित्ताने सुट्टी राहणार आहे,
याच महिन्यात दिवाळीच्या दहा दिवस सुट्टी असतील, म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात एकूण 11 दिवस शाळांना सुट्ट्या राहतील. नोव्हेंबर महिन्यात गुरुनानक जयंती निमित्ताने शाळेला सुट्टी राहील.
डिसेंबर मध्ये ख्रिसमस निमित्ताने शाळेला सुट्टी राहणार आहे. जानेवारीमध्ये मकरसंक्रांती, शबे- ए- मेराज, प्रजासत्ताक दिन निमित्ताने शाळांना सुट्टी राहणार. फेब्रुवारीमध्ये शब-ए-बरात, महाशिवरात्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने शाळेला सुट्टी राहील.
मार्चमध्ये धुलिवंदन, रंगपंचमी, शब-ए-कदर, गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती निमित्ताने तब्बल सहा दिवस सुट्ट्या राहतील. एप्रिलमध्ये गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शाळांना सुट्टी राहणार आहे. मे महिन्यात महाराष्ट्र दिनानिमित्ताने सुट्टी राहील तसेच याच महिन्यात उन्हाळी सुट्ट्या सुरू होतील.
दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्या कधी असणार?
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार, यावर्षी दिवाळीच्या सुट्ट्या 16 ऑक्टोबर 2025 ते 27 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राहतील. म्हणजेच दिवाळीच्या वेळी विद्यार्थ्यांना दहा दिवस सुट्ट्या राहतील.
तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्या 38 दिवस राहणार आहे. दोन मे 2026 ते 13 जून 2026 या कालावधीत एकूण 38 दिवसांसाठी उन्हाळी सुट्ट्या राहणार आहेत. म्हणजे मे 2026 मध्ये 26 दिवस आणि जून 2026 मध्ये बारा दिवस उन्हाळी सुट्ट्या राहणार आहेत.