शॉवर आणि नळावरील गंज 5 मिनिटांत होईल साफ, ‘हा’ एकच घरगुती जुगाड करेल कमाल!

Published on -

बाथरूममधील नळ किंवा शॉवर काळानुसार गंजायला लागतात, आणि एकदा गंज लागला की ते पुन्हा पूर्वीसारखे चमकदार दिसणं कठीण होऊन जातं. यामुळे अनेक घरांमध्ये बाथरूमचा देखावा खराब होतो आणि जुना, जीर्ण भासतो. पण काही साध्या घरगुती युक्त्या वापरल्या तर हे गंजलेले डाग दूर करणं अगदी सोपं होऊ शकतं. आज आपण अशाच एका पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत, जी वापरली की तुम्हालाही आश्चर्य वाटेल, इतकं प्रभावी काम ती करते.

बाथरूममध्ये नित्यनेमाने वापरले जाणारे नळ आणि शॉवर हे सातत्याने पाण्याच्या संपर्कात असतात. विशेषतः जिथे पाण्यात लोखंडाचे प्रमाण जास्त असते, तिथे या उपकरणांना गंज अधिक लवकर लागतो. गंज लागल्यावर त्यांची बाह्य चमक कमी होते आणि हळूहळू ते कुरूप दिसायला लागतात. अनेकदा आपण केमिकल्स, क्लीनर वापरतो पण त्यातून अपेक्षित परिणाम मिळत नाही, उलट काहीवेळा पॉलिश खराब होते किंवा हातांना त्रास होतो.

 

लिंबूचा ‘असा’ करा वापर

मात्र लिंबू हा असा एक घटक आहे जो आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतो आणि गंजाच्या समस्येवर अत्यंत परिणामकारक उपाय ठरतो. लिंबूमध्ये असलेलं नैसर्गिक आम्ल हे गंजावर रासायनिक प्रतिक्रिया करतं आणि गंज मऊ करून त्याला दूर करतं. यासाठी लिंबू अर्धा कापून तो गंजलेल्या नळावर किंवा शॉवरवर चोळा आणि काही वेळ तसेच राहू द्या. त्यानंतर एक ओलसर कपडा वापरून तो भाग स्वच्छ करा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

लिंबू रस आणि मीठ

जर गंज अधिक जड असेल, तर लिंबाच्या रसात मीठ मिसळून जुन्या टूथब्रशच्या मदतीने नळ घासून काढा. ही पेस्ट 10 मिनिटे तसेच ठेवावी आणि मग थंड पाण्याने धुवावी. मीठ हे स्क्रबरसारखं काम करतं आणि लिंबाच्या आम्लासोबत मिळून गंज लवकर काढून टाकतं.

कोका कोला

एक अत्यंत वेगळा आणि प्रभावी उपाय म्हणजे अॅल्युमिनियम फॉइल आणि कोका कोला. कोका कोलामध्ये असणारं कार्बोनिक अॅसिड गंजलेल्या आयर्नसह प्रतिक्रिया करतं आणि ते गंज दूर करतं. अॅल्युमिनियम फॉइलचा एक गोळा तयार करा, तो कोलामध्ये बुडवा आणि त्यानंतर नळावर हलक्या हाताने घासा. काही मिनिटांत गंज विरघळतो आणि नळ पुन्हा एकदा नवीनसारखा चमकू लागतो.

 

या उपायांचा एक मोठा फायदा म्हणजे यामध्ये कोणतीही महागडी रासायनिक उत्पादने वापरावी लागत नाहीत, आणि ते उपाय घरच्या घरी सहज करता येणारे आहेत. स्वच्छतेसोबतच हे पर्यावरणपूरक आणि सुरक्षित उपाय आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!