जगातील सर्वाधिक उंच पूल महाराष्ट्रातील ‘या’ भागात तयार होतोय ! डिसेंबर 2025 मध्ये होणार लोकार्पण

महाराष्ट्राला लवकरच आशिया खंडातील सर्वाधिक रुंदीच्या बोगद्याची भेट मिळणार आहे. राज्यातील एका नव्या रस्ते विकासाच्या प्रकल्पाचे काम येत्या काही महिन्यांनी पूर्ण होईल आणि डिसेंबर 2025 मध्ये हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. 

Published on -

Maharashtra News : आशिया खंडातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आणि जगातील सर्वाधिक उंचीचा केबल स्टेड पूल ही वैशिष्ट्य असणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प डिसेंबर 2025 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रोजेक्ट डिसेंबर महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे.

यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर पुणे – मुंबई या दोन्ही शहरा दरम्यानचे प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ वाचावा या हेतूने हा मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जात आहे. लोणावळ्याजवळील सिंहगड इन्स्टिट्यूट ते खालापूर यादरम्यान बोगदा खोदून हा मिसिंग लिंक तयार केला जात असून या प्रकल्पाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे.

महत्त्वाची बाब अशी की, बाकी राहिलेले काम ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण केले जाईल आणि त्यानंतर मग या मिसिंग लिंक प्रकल्पावर आवश्यक असणाऱ्या सर्व चाचण्या घेतल्या जातील आणि त्यानंतर डिसेंबर महिन्यात हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

पुणे – मुंबई प्रवास होणार सुपरफास्ट!

या प्रकल्पामुळे पुणे ते मुंबई दरम्यानचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. खरे तर जुन्या पुणे मुंबई हायवे ने प्रवास करताना या मार्गावरील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असे.

जुन्या पुणे मुंबई हायवेने या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना सात ते आठ तासांचा वेळ लागत. पण पुणे मुंबई एक्सप्रेस वे मुळे हा प्रवासाचा कालावधी चार तासांवर आला.

मात्र बोर घाटात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. हा महामार्ग जलद प्रवासाचा अनुभव देईल असे वाटत होते पण आता तो कूचकामी ठरतोय. हेच कारण आहे की मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.

या प्रकल्पामुळे पुणे ते मुंबई दरम्यानचे प्रवासाचे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार आहे तर प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल अशी आशा आहे. म्हणजे मुंबई ते पुणे हा प्रवास या प्रकल्पामुळे अवघ्या साडेतीन तासात पूर्ण होऊ शकतो.

कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प?

सध्या पुणे मुंबई एक्सप्रेस वेळेवर सिंहगड इन्स्टिट्यूट ते खालापूर या दरम्यानचे अंतर 19 किलोमीटर इतके आहे मात्र सिंहगड इन्स्टिट्यूट ते खालापूर यांना जोडणाऱ्या मिसिंग लिंकचे अंतर 13.3 किलोमीटर इतके आहे म्हणजेच हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचे अंतर 6 km ने कमी होणार आहे.

या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्प अंतर्गत विकसित होणाऱ्या बोगद्याची एकूण लांबी 10.55 किमी इतकी आहे. यापैकी एक बोगदा 2.5 कि.मी. लांबीचा आहे जो की लोणावळा डॅमच्या 175 मीटर खालून जातोये.

या बोगद्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा बोगदा आशिया खंडातील सर्वाधिक रुंद बोगदा राहणार आहे. या बोगद्याची रुंदी 23.75 मीटर इतकी आहे.

देशातील पहिला केबल स्टेड पुल

या मार्गात 2 केबल स्टेड पूल सुद्धा विकसित केले जात आहेत. यापैकी एकाची लांबी 900 मीटर इतकी आहे तर दुसऱ्या एका पुलाची लांबी 650 मीटर इतकी आहे. याची रुंदी ही 26 मीटर एवढी आहे.

या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 31 हजार टन स्टील आणि 3.5 लाख घनमीटर काँक्रीट वापरण्यात आले असल्याचा दावा केला जातोय. नक्कीच या प्रकल्पामुळे पुणे ते मुंबई दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे यात शंकाच नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe