अहिल्यानगर जिल्हा विद्यार्थ्यांच्या खुनाने हादरलाय. नगर शहरातील प्रसिद्ध सिताराम सारडा विद्यालय परिसरात विद्यार्थ्याची हत्या करण्यात आलीये. धारदार शस्त्राने वार करत तेरा वर्षियविद्यार्थ्याचा खून झाला आहे. अफान मुस्तकीर शेख असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो असून तो दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता.
खून करणारा विद्यार्थी देखील तेथेच शिक्षण घेत असल्याची माहिती समजली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी त्यास ताब्यात घेतले असल्याचे समजते. या दोघांचे यापूर्वी देखील भांडणे झाली होती परंतु यावेळचे भांडण जास्तच विकोपाला गेले अन एकाने दुसऱ्या विद्यार्थ्यांवर थेट खून हल्ला केला.

शस्त्राने भोसकले. दरम्यान इतरांनी जखमी अफान शेख याला जिल्हा रूग्णालयात नेले होते परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. परिसरात सध्या तणावपूर्व शांतता असून पोलीस घटनास्थळी आहेत.