मिड-रेंज स्मार्टफोन बाजारात एक धडाकेबाज पर्याय शोधत असाल, जो उत्तम कॅमेरा, दमदार परफॉर्मन्स आणि मजबूत बांधणीसह येतो, तर मोटोरोलाचा Moto Edge 50 Pro तुमच्यासाठी एक जबरदस्त डील ठरू शकतो. सध्या अमेझॉनवर या फोनवर प्रचंड सूट मिळत असून, अनेक जण या संधीचा फायदा घेत आहेत. या फोनच्या फीचर्सपासून ते सध्याच्या सवलतींपर्यंत जाणून घेऊया-

Moto Edge 50 Pro
Moto Edge 50 Pro हा फोन त्याच्या वैशिष्ट्यांमुळे आधीपासूनच लोकप्रिय आहे, पण आता या सेलमुळे त्याचं आकर्षण आणखीनच वाढलं आहे. हा फोन भारतात ₹35,999 मध्ये लाँच झाला होता, पण अमेझॉनवरील ऑफर अंतर्गत तो आता फक्त ₹29,999 मध्ये खरेदी करता येतो. म्हणजेच तब्बल ₹6,000 ची थेट सूट. यासोबतच काही बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर जोडल्यास ही किंमत आणखी कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, Axis, RBI किंवा Federal बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास ₹750 पर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो. जुना फोन एक्सचेंज केला तर ₹20,000 पर्यंतची सूट मिळण्याचीही शक्यता आहे. शिवाय, 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे.
हा फोन त्याच्या अत्याधुनिक स्पेसिफिकेशन्ससाठी ओळखला जातो. 6.7 इंचांचा pOLED डिस्प्ले, जो 144Hz चा रिफ्रेश रेट देतो, यामुळे स्क्रीन अनुभव अतिशय स्मूथ बनतो. स्क्रीन 1.5K रिझोल्यूशनसह येते आणि 2000 nits पर्यंत पीक ब्राइटनेस मिळते, त्यामुळे सूर्यप्रकाशातसुद्धा स्पष्ट डिस्प्ले अनुभव मिळतो. या फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर वापरला गेला आहे, जो 4nm टेक्नॉलॉजीवर आधारित असून, गेमिंगपासून मल्टिटास्किंगपर्यंत उत्तम कामगिरी करतो.
कॅमेरा आणि बॅटरी
कॅमेराच्या बाबतीतही Moto Edge 50 Pro मागे नाही. 50MP चा OIS प्रायमरी सेन्सर, 13MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 50MP चा फ्रंट सेल्फी कॅमेरा मिळतो. विशेषतः सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा कॅमेरा अगदी परफेक्ट आहे. बॅटरीकडे वळल्यास, या फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आहे, जी 125W टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते. फक्त 15 मिनिटांत फोन 50% पर्यंत चार्ज होतो, त्यामुळे वेळ वाचतो आणि सतत चार्जिंगची झंझट राहत नाही.
सुरक्षेच्या बाबतीतही हा फोन अगदी पक्का आहे. IP68 वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ रेटिंगसह, MIL-STD-810H सर्टिफाइड म्हणजे याला वॉटर आणि शॉक प्रोटेक्शन दोन्ही मिळाले आहे. त्यामुळे याला ‘आयर्न फोन’ असंही म्हटलं जातं. डिझाइनबाबत बोलायचं झालं, तर याची स्लिम आणि प्रीमियम लुक असलेली बॉडी कॅनव्हास ब्लॅक, लुसेंट पर्पल आणि पर्ली व्हाइट अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.