कोणताही व्यायाम किंवा कठीण डाएट न करता कमी करा पोटाची चरबी, ‘ही’ एकच गोष्ट तुम्हाला बनवेल स्लिम अँड फिट!

Published on -

वाढतं वजन आणि विशेषतः पोटावर साठणारी चरबी ही आजकाल जवळपास प्रत्येक घरातली समस्या झाली आहे. बाहेरून दिसतंय तितकं हे फक्त सौंदर्याचं नाही, तर आरोग्याचंही मोठं संकट आहे. त्यामुळेच वजन कमी करायचं, तेही लवकर, असं ध्येय गाठण्यासाठी लोक अनेक उपाय करताना दिसतात. कधी जिममध्ये घाम गाळतात, तर कधी उपासमार करून आहार मर्यादित करतात. पण हे करताना एक गोष्ट अनेकदा दुर्लक्षित होते ती म्हणजे योग्य प्रमाणात प्रथिनांचं सेवन.

प्रथिनं गरजेची का?

आहार आणि व्यायाम या दोघांचीच भूमिका वजन कमी करण्यात अत्यंत महत्त्वाची असते. पण जर तुम्ही फक्त आहार कमी करत राहिलात आणि त्यातून आवश्यक पोषकतत्त्व म्हणजे प्रथिनेच कमी केलीत, तर तुमचं शरीर उलट चालायला लागेल.

प्रथिने चरबी कमी करायला आणि चयापचय वेगवान ठेवायला खूप मदत करतात. जेव्हा तुम्ही पुरेसं प्रथिनं खाता, तेव्हा शरीर ती पचवण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करतं, ज्यामुळे अधिक कॅलोरीज जळतात. शिवाय, प्रथिनं पोट भरल्यासारखं वाटू देतात, त्यामुळे सारखं काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही आणि याचा थेट परिणाम पोटावरच्या चरबीवर होतो.

प्रथिनं असलेले अन्नपदार्थ कोणते?

प्रथिनं कुठून मिळतील, हा प्रश्न अनेकांना पडतो. डाळ, टोफू, दूध, दही, चीज, हरभरा, शेंगदाणे, अंकुर यामध्ये भरपूर प्रथिनं असतात. मांसाहार करणाऱ्यांसाठी अंडी, चिकन, मासे हे चांगले स्रोत आहेत. आणि हो, प्रथिनं म्हणजे फक्त बॉडीबिल्डर लोकांसाठी नव्हे रोजचं काम, थोडंफार व्यायाम किंवा चालणं करणाऱ्या महिलांनाही दिवसाकाठी सुमारे 45 ते 60 ग्रॅम प्रथिनं आवश्यक असतात. पण जर तुम्ही जास्त मेहनतीचा व्यायाम करत असाल, तर हे प्रमाण 70 ते 80 ग्रॅमपर्यंत वाढू शकतं.

मात्र, यातल्या कोणत्याही गोष्टीचा अवलंब करण्याआधी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, आणि त्यानुसार आहारसुद्धा ठरायला हवा. पण इतकं नक्की की, तुमच्या आहारात प्रथिनं पुरेशा प्रमाणात असतील, तर वजन कमी करणं खूप सहज आणि सोपं होऊन जातं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!