ITR Filing 2025 सुरु ! ह्या चुका टाळा नाहीतर भरावा लागेल दंड आणि होईल जेलची हवा सुद्धा…

Published on -

Income Tax Return Filing 2025 : आता आयकर रिटर्न भरण्याचा हंगाम सुरू झालाय आणि सरकारनं यंदा थोडं मोकळं वेळापत्रक दिलंय. तुम्ही तुमचा ITR म्हणजेच आयकर परतावा १५ सप्टेंबरपर्यंत भरू शकता. पण एवढा वेळ मिळालाय म्हणून अजिबात हलगर्जीपणा करू नका. कारण एक छोटी चूकही महागात पडू शकते अगदी दंडापर्यंत किंवा तुरुंगवासापर्यंतसुद्धा

म्हणजे नेमकं काय?

जर तुम्ही रिटर्न भरताना तुमचं काही उत्पन्न लपवलं, खोटी माहिती दिली, बनावट कागदपत्रं लावली किंवा चुकीचा सूट (डिडक्शन) घेतला, तर आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो. आता सरकारकडे सगळ्या आर्थिक व्यवहारांची माहिती असते. मोठा व्यवहार, गुंतवणूक, बँकेतील व्यवहार किंवा अगदी क्रिप्टोमध्ये कमावलेले पैसेसुद्धा काहीही लपवता येत नाही.

आता आयकर विभाग खूप सतर्क झाला आहे. जर त्यांना वाटलं की तुमचं दाखवलेलं उत्पन्न आणि केलेले व्यवहार जुळत नाहीत, तर थेट नोटीस येते. त्यामुळे रिटर्न भरताना तुमचं कोणतंही उत्पन्न – अगदी लहान असो की मोठं ते नीट दाखवा, एखादं उत्पन्न विसरलं गेलं, चुकून लिहिलं गेलं तर घाबरू नका. तुम्हाला परत रिटर्न सुधारून भरता येतो. पण ही चूक मुद्दाम केली असेल, तर मग मोठा दंड लागतो – आणि काही वेळा जेलची शिक्षा देखील होऊ शकते.

कायदा काय सांगतो?

आयकर कायद्यानुसार, जर कुणी मुद्दाम करचुकवेगिरी केली आणि ती रक्कम ₹1 लाखाच्या वर असेल, तर त्याला ६ महिने ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगात जावं लागू शकतं. यासोबतच २०० टक्के दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे हे फारच गंभीर आहे.

थोडक्यात काय?

रिटर्न भरताना घाई करू नका, कुठलीही माहिती लपवू नका, आणि जर काही राहिलं असेल तर सुधारित रिटर्न भरून ती गोष्ट दुरुस्त करा. आयकर विभागाला फसवण्याचा प्रयत्न कराल, तर खूप मोठा फटका बसू शकतो. आयकर रिटर्न ही फक्त सरकारी कागदपत्र नाही, ती तुमच्या प्रामाणिकपणाची निशाणी आहे. त्यामुळे ती नीट, वेळेत आणि पूर्णपणे खरी माहिती देऊन भरा. भविष्यात त्रास टाळायचा असेल, तर हीच योग्य वेळ आहे सगळं साफसफाईने हाताळण्याची.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!