इंग्रजी शिकवून कुवेतमध्ये मिळवा महिन्याला ₹1 लाख, कुवेतमध्ये ‘या’ टॉप-5 नोकऱ्या देतात लाखोंची कमाई!

Published on -

कुवेतसारख्या समृद्ध खाडी देशामध्ये नोकरी मिळवणं अनेक भारतीयांसाठी केवळ उपजीविकेचं साधन नसून, आयुष्य बदलून टाकणारा अनुभव ठरू शकतो. उच्च पगार, करमुक्त उत्पन्न आणि उत्तम राहणीमान यामुळे दरवर्षी हजारो युवक कुवेतमध्ये करिअर संधी शोधण्यासाठी प्रयत्न करत असतात. विशेष म्हणजे काही विशिष्ट नोकऱ्यांना इथे जबरदस्त मागणी आहे आणि या नोकऱ्या तुम्हाला लाखोंचा पगार तर देतातच, पण भविष्यात करोडपतीही बनवू शकतात!

सध्या कुवेतमध्ये काही अशा नोकऱ्या आहेत ज्या केवळ आर्थिक दृष्टीने फायदेशीर नाहीत, तर करिअरच्या दृष्टीनेही अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. या नोकऱ्या कोणत्या आहेत आणि त्यांचे पगार किती मिळतात, हे जाणून घेऊया-

व्यवसाय प्रशासक

सर्वात आधी नाव येतं व्यवसाय प्रशासकाचं. कुवेतमध्ये अनेक परदेशी कंपन्या स्थायिक होत असल्यामुळे व्यवस्थापन करणाऱ्या कुशल व्यक्तींची मागणी वाढली आहे. एका व्यवसाय प्रशासकाला दरमहा सुमारे 400 कुवेती दिनार, म्हणजेच जवळपास ₹1,09,000 पर्यंत पगार मिळतो. कंपनीचा विकास आणि कामकाज सुरळीत चालवण्याचं काम पाहणाऱ्या या पोस्टसाठी व्यवस्थापन क्षेत्रातील शिक्षण असणं गरजेचं आहे.

मॉल मॅनेजर

दुसरी महत्त्वाची आणि आकर्षक नोकरी आहे मॉल मॅनेजर. मध्य पूर्वेतील मॉल संस्कृती जगप्रसिद्ध आहे. कुवेतसारख्या आधुनिक शहरांमध्ये अनेक भव्य मॉल्स आहेत आणि त्या व्यवस्थापित करण्यासाठी सक्षम मॅनेजर्सची सतत गरज असते. या पदासाठी दरमहा सरासरी 500 कुवेती दिनार मिळतात, जे सुमारे ₹1,35,000 इतके होतात.

इंग्रजी शिक्षक

तिसऱ्या क्रमांकावर आहे इंग्रजी शिक्षक. अरबी आणि फारसी भाषेच्या प्रांतात इंग्रजी भाषेची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भारतीय इंग्रजी शिक्षकांना इथे खूप संधी मिळतात. या पदासाठी दरमहा 300 ते 350 कुवेती दिनार म्हणजे सुमारे ₹82,000 ते ₹95,000 पर्यंतचा पगार मिळतो.

ग्राफिक डिझायनर

डिजिटल युगात चौथी सर्वाधिक मागणी असलेली नोकरी म्हणजे ग्राफिक डिझायनर. कुवेतमध्ये ब्रँडिंग, जाहिरात, डिजिटल मीडिया क्षेत्र झपाट्याने विकसित होतंय. त्यामुळे वेबसाईट्स, अ‍ॅप्स आणि सोशल मीडियासाठी चांगल्या डिझायनर्सना मोठी मागणी आहे. यासाठी 250 ते 350 कुवेती दिनार म्हणजेच ₹68,000 ते ₹95,000 पर्यंत पगार मिळतो.

इंजिनिअर्स

पण या यादीतील सर्वात जास्त पगाराची आणि ‘करोडपती बनवणारी’ नोकरी म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील काम. इंजिनिअर्ससाठी कुवेत हे एक सुवर्णसंधीचं ठिकाण आहे. बांधकाम, तेल, ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्रांमध्ये विशेषतः भारतीय इंजिनिअर्सची खूप मागणी आहे. यासाठी दरमहा 600 ते 750 कुवेती दिनार, म्हणजे सुमारे ₹1.6 लाख ते ₹2 लाख पर्यंत पगार मिळतो.

या सर्व नोकऱ्या केवळ आर्थिक स्थैर्यच देत नाहीत, तर तुमच्या करिअरमध्येही भक्कम स्थान निर्माण करतात. त्यामुळे तुम्ही जर परदेशात करिअर करू इच्छित असाल, तर कुवेतमधील या संधी तुमच्यासाठी सोन्याची संधी ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!