फॅट कटर, स्किन ग्लो ते इम्युनिटी बूस्टर…; अननस खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला थक्क करतील!

Published on -

अननस हे एक असं फळ आहे, जे पाहिलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं. त्याच्या गोडसर-आंबट चवेमुळे ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. या अननसाचे आपल्या आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. आज 27 जूनरोजी आंतरराष्ट्रीय अननस दिन जगभर साजरा केला जातोय. आजच्या या खास दिवशी आपण अननसचे आश्चर्यकारक फायदे समजून घेऊ.

‘फॅट कटर’

अननस केवळ एक फळ नाही, तर तो आपल्या शरीरासाठी एक नैसर्गिक औषध आहे, असं म्हणायला हरकत नाही. अनेक जण हे ‘फॅट कटर’ म्हणूनही ओळखतात, कारण ते शरीरातील अनावश्यक चरबी कमी करण्यास मदत करतं. व्यायाम आणि संतुलित आहारासोबत अननसाचा समावेश केल्यास वजन घटवणं अधिक सोपं होतं. त्यामुळे अनेक फिटनेसप्रेमी दररोजच्या आहारात अननस न विसरता घेतात.

स्कीनसाठी बेस्ट

अननसात असलेल्या ब्रोमेलेन नावाच्या एंझाइममुळे पचन सुधारतं, शरीरातील सूज कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते. त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे त्वचा उजळण्यात आणि शरीर ताजेतवाने ठेवण्यात मदत करतात. उन्हाळ्यात तर त्याचा रस थेट थकवा काढून टाकतो.

महिलांसाठी फायदेशीर

याच कारणामुळे अननस केवळ आरोग्यदायी नाही, तर सौंदर्यवर्धक देखील मानलं जातं. विशेषतः महिलांसाठी हे फळ अत्यंत फायदेशीर आहे. मासिक पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी असो किंवा अशक्तपणा अननस यावर प्रभावी उपचार ठरतो. यामध्ये भरपूर लोह असल्याने शरीरात हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि थकवा दूर होतो.

अननस खाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, सॅलडमध्ये त्याचा गोडसर तुकडा, थंड अननसाचा रस, अननसाचा केक किंवा ग्रील्ड अननसचा खास प्रकार… प्रत्येक रूपात तो जेवणात चव वाढवतोच, पण आरोग्यालाही पोषण देतो. त्यामुळेच ब्रिटनसारख्या देशात अननसाला ‘फळांचा राजा’ म्हटलं गेलं आहे. त्याच्या डोक्यावरच्या हिरव्या मुकुटामुळे त्याला राजेशाही लूक मिळतो आणि त्याच्या चवेमुळे राजासारखी लोकप्रियता.

महत्त्वाचं म्हणजे, अननसात सुमारे 85 टक्के पाणी असतं. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भरून निघते. त्याचे दाहनाशक आणि विषाणूविरोधी गुणधर्म शरीरातील सूज कमी करतात आणि आजारांपासून बचाव करतात.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!