नागपूरमध्ये तयार झालं जगाला धडकी भरवणारं ड्रोन, भारतीय हवाई दलाच्या नागास्त्र-1आर ची शक्ती थरकाप उडवणारी!

Published on -

भारताच्या संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वेगाने वापर होत असताना, भारतीय हवाई दलासाठी एक अत्यंत घातक आणि आधुनिक शस्त्र तयार झालं आहे, नागास्त्र-1R. हे केवळ एक ड्रोन नाही, तर हवेतून शत्रूवर अचूक आणि चोरट्या पद्धतीने हल्ला करणारी एक आत्मघातकी यंत्रणा आहे. भारताच्या “मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत तयार झालेलं हे ड्रोन आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात सामील होत आहे.

नागास्त्र-1R ड्रोन

नागपूरमधील सोलर इंडस्ट्रीज या कंपनीने बनवलेलं नागास्त्र-1R हे ड्रोन ‘UAV’ म्हणजेच Unmanned Aerial Vehicle वर आधारित आहे, जे माणसाशिवाय हवेत उडू शकतं आणि स्वयंचलित प्रणालीने लक्ष्यावर निशाणा साधतं. याची खासियत म्हणजे याचं ‘कामिकाझे’ स्वरूप. हे ड्रोन शत्रूवर तडाखा देऊन स्वतःसह उडवतं, म्हणजेच ते आत्मघातकी मिशनसाठी तयार करण्यात आलं आहे.

भारत सरकारने नुकतीच यापैकी 450 ड्रोन खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे. यापैकी 120 ड्रोन आधीच भारतीय सैन्याकडे पोहोचले आहेत. ही खरेदी आपत्कालीन शस्त्र खरेदी धोरणांतर्गत करण्यात आली आहे. नागास्त्र-1R ची क्षमता केवळ शत्रूच्या ठिकाणांचा वेध घेण्यात नाही, तर त्या जागांवर अत्यंत अचूक हल्ला करण्यात आहे. ते GPS मार्गदर्शन प्रणालीवर आधारित असून, लक्ष्याच्या अगदी 2 मीटर अंतरावर अचूक प्रहार करण्याची ताकद यामध्ये आहे.

नागास्त्र-1R ड्रोनची वैशिष्ट्ये

हे ड्रोन 4,500 मीटरपेक्षा अधिक उंचीवर उडू शकते आणि 60 मिनिटांपर्यंत आकाशात सक्रिय राहू शकते. 15 किलोमीटर पर्यंत याचे नियंत्रण ठेवता येते, आणि विशेष म्हणजे, हे ड्रोन शत्रूच्या रडारला सहज गवसत नाही, हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. पाकिस्तान आणि चीनसारख्या प्रतिस्पर्धी देशांवर नजर ठेवण्यासाठी नागास्त्र-1R अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.

यात आणखी एक विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे, जर याला आपले उद्दिष्ट गाठता आलं नाही, तर हे ड्रोन परत येण्यास सक्षम आहे. पॅराशूटच्या सहाय्याने ते जमिनीवर उतरवलं जाऊ शकतं, जे अशा प्रकारच्या आत्मघातकी ड्रोनमध्ये एक दुर्मिळ गुणवत्ता आहे.

भारतीय हवाई दलासाठी नागास्त्र-1R म्हणजे केवळ एक ड्रोन नाही, तर हे एक चालतं-बोलतं युद्धशस्त्र आहे. हे शत्रूच्या हद्दीत कुठल्याही मनुष्याच्या हस्तक्षेपाशिवाय घुसू शकतं, त्याचं लक्ष्य हेरू शकतं आणि आवश्यक तेव्हा त्याच्यावर प्राणघातक हल्ला करू शकतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!