पेट्रोल 6 रुपये लिटर पण पाणी?, इराणमधील 1 लिटर पिण्याच्या पाण्याची किंमत ऐकून थक्क व्हाल!

Updated on -

इराणमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबाबत सध्या सोशल मीडियावर मोठीच चर्चा सुरू आहे. पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनावर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशात हे दर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. भारतात जिथे एका लिटर पेट्रोलची किंमत 100 रुपये पार करत असते, तिथे इराणमध्ये ही किंमत केवळ काही रुपयांत असल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण या किमतींच्या तुलनेत इराणमध्ये एका सामान्य गोष्टीची किंमत खूपच जास्त आहे, ती म्हणजे पाणी.

 

इराणमधील इंधन दर

 

मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि इस्रायलमधील संघर्ष पुन्हा उफाळून आला होता. अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर 13 जूनपासून युद्धबंदी लागू करण्यात आल्याचं जरी सांगितलं गेलं, तरी प्रत्यक्षात शांततेचे वातावरण अजूनही फारसं दिसून आलेलं नाही. या परिस्थितीत इंधन पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली होती आणि भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण या सर्व घडामोडींच्या दरम्यान इराणमधील स्थानिक इंधन दरांची माहिती सोशल मीडियावर झपाट्याने पसरली.

 

इन्स्टाग्रामवरील ‘द ट्रॅव्हलिंग ड्यूड’ नावाच्या व्हीलॉगरने इराणच्या पेट्रोल पंपावरून एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यात सांगितले की इराणमध्ये डिझेल फक्त 1 रुपये प्रति लिटर आणि पेट्रोल फक्त 6 रुपये लिटर इतक्या कमी किमतीत उपलब्ध आहे. ही माहिती ऐकून भारतीय वापरकर्ते अक्षरशः थक्क झाले. काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या की, “भाऊ परत येताना 10 लिटर पेट्रोल घेऊन ये,” तर काहींनी “पाईपलाईन भारतापर्यंत टाका” अशी कमेंट केली.

इराणमधील पाण्याचे दर

पण या सगळ्यात सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे पाण्याचा दर. व्हीलॉगरच्या म्हणण्यानुसार, इराणमध्ये 500 मिली पाण्याची बाटली 10 ते 12 रुपयांना विकली जाते. म्हणजेच इथे पाणी हे पेट्रोलपेक्षा जवळपास 2 ते 3 पट महाग आहे. ही बाब खरोखर विचार करायला लावणारी आहे. कारण जेथे इंधन इतके स्वस्त आहे, तिथे पिण्याच्या पाण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात, ही स्थिती तितकीशी सहज समजणारी नाही.

इंधनाच्या अशा किमतींच्या मागे इराण सरकारची इंधन सबसिडी आणि स्थानिक उत्पादन कारणीभूत आहेत. इराण कच्च्या तेलाचा एक मोठा उत्पादक आहे आणि इंधनाचे दर देशांतर्गत पातळीवर नियंत्रित ठेवले जातात. त्यामुळे तेथील नागरिकांना स्वस्तात इंधन मिळते. पण याच वेळी, पाणी टंचाई, हवामान बदल आणि समुद्रातील पाणी शुद्ध करण्याचा खर्च यामुळे पाण्याच्या किमती वाढलेल्या आहेत.

एकंदरीत, इराणमधील इंधनाच्या अविश्वसनीय किमती जरी चर्चेचा विषय ठरत असल्या, तरी त्या मागे अनेक राजकीय, आर्थिक आणि सामाजिक पैलू दडलेले आहेत. या बाबी पाहता, एखाद्या गोष्टीचं बाह्य स्वरूप जितकं आकर्षक वाटतं, तितकंच त्यामागचं वास्तवही गुंतागुंतीचं असतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!