भारतात दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो, आणि काही राज्यांत दारूबंदी असली तरी महसुलाचा मोठा हिस्सा हा दारूपासूनच मिळतो. पण जगात एक अशी जागा आहे जिथे दारू खरेदीसाठी तुमच्या पत्नीची परवानगी घेणे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे, हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

पेन्सिल्व्हेनियामधील नियम
अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया नावाच्या राज्यात एक विचित्र नियम आहे. जर एखाद्या विवाहित पुरुषाला दारू खरेदी करायची असेल, तर त्याने आधी पत्नीची संमती घ्यावी लागते. जरी आजच्या आधुनिक काळात या नियमाचे पालन फारसे होत नसले, तरी कागदोपत्री हा नियम आजही अस्तित्वात आहे. अनेक नागरिक आणि दुकानदारदेखील या नियमाला फारसं गांभीर्याने घेत नाहीत, पण तरीही यामुळे पेन्सिल्व्हेनिया चर्चेत राहतो.
याच राज्यात दारू आणि बिअरसाठी वेगवेगळी दुकाने आहेत. म्हणजेच, तुम्हाला बिअर घ्यायची असेल तर वेगळं दुकान गाठावं लागेल आणि वाईन किंवा हार्ड लिकर घेण्यासाठी दुसरं दुकान शोधावं लागेल. भारतात जसं एकाच ठिकाणी सर्व प्रकारची दारू सहज मिळते, तसं पेन्सिल्व्हेनियामध्ये नाही. यामुळे स्थानिक लोकांना अनेकदा गैरसोयीचा सामना करावा लागतो.
दारू खरेदीसाठीचे नियम
पेन्सिल्व्हेनियात दारू खरेदीसाठी कायदेशीर वय 21 वर्षे आहे. भारतात हे वय विविध राज्यांनुसार बदलतं. काही ठिकाणी 18, काही ठिकाणी 25 वर्षांपर्यंत. पण अमेरिकेच्या या राज्यात वयाची शिस्त अतिशय काटेकोरपणे पाळली जाते. जर तुम्ही 21 वर्षांखाली असाल, तर तुमचं दारू घेणं केवळ गैरकायदेशीर नाही, तर त्यासाठी कठोर शिक्षा होऊ शकते.
दारू खरेदी करताना तुम्हाला तुमचं वय सिद्ध करावं लागतं. ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा सरकारी ओळखपत्र दाखवणं बंधनकारक आहे. तसेच, पेन्सिल्व्हेनिया हे दारूप्रती अतिशय कठोर धोरण असलेलं राज्य मानलं जातं. धार्मिक किंवा वैद्यकीय कारणास्तव देखील इथे फारसा अपवाद ठेवलेला नाही, जे इतर देशांमध्ये कधी कधी दिसतो.