भारताचे शुभांशू शुक्ला यांना Axiom-4 मिशनसाठी किती मानधन मिळणार?, आकडा ऐकून थक्क व्हाल!

Published on -

एका ऐतिहासिक अंतराळ मोहिमेत भारतीय वायुसेनेतील अधिकारी शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात उड्डाण केलं आणि भारताच्या अंतराळ इतिहासात नवीन पान जोडलं. 25 जून रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रस्थान केलं आणि भारताचे पहिले ‘ISS अंतराळवीर’ ठरण्याचा मान पटकावला.

शुभांशू शुक्ला हे मूळचे लखनऊचे आहेत आणि गेली 15 वर्षे ते भारतीय वायुसेनेत लढाऊ पायलट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी Su-30 MKI, MiG-21, MiG-29, Jaguar आणि Hawk यांसारख्या लढाऊ विमानांचा अनुभव घेतला आहे. त्यांच्या नावावर तब्बल 2,000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. अशा अनुभवी पायलटला अंतराळात पाठवण्याचा निर्णय घेतला गेला, तेव्हा देशभरातून त्यांचे अभिनंदन झालं.

‘अ‍ॅक्सिओम-4’ मोहीम

त्यांचा हा प्रवास ‘अ‍ॅक्सिओम-4’ या मोहिमेचा भाग आहे, ज्याला भारतात ‘मिशन आकाशगंगा’ या नावाने ओळखलं जातं. ही मोहिम नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून सुरू झाली असून, SpaceX च्या Crew Dragon C213 या यानामार्फत अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले. विशेष म्हणजे शुभांशू शुक्ला हे राकेश शर्मा यांच्या नंतर अंतराळात पोहोचणारे दुसरे भारतीय ठरले आहेत, मात्र आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे ते पहिले भारतीय ठरले.

शुभांशू शुक्ला यांचा पगार

या मोहिमेसाठी निधी NASA आणि ISRO ने मिळून दिला असला, तरी शुभांशू यांना त्यासाठी कोणतंही खास वेतन NASA किंवा ISRO कडून दिलं जाणार नाही. त्यांना पगार मिळेल तो भारतीय हवाई दलाकडूनच. AmbitionBox च्या आकडेवारीनुसार, भारतीय हवाई दलातील ग्रुप-4 च्या कॅप्टनला महिन्याला सुमारे ₹2,43,000 ते ₹2,53,000 दरम्यान वेतन मिळतं. या वेतनाचा वार्षिक आकडा ₹18 लाख ते ₹65 लाख दरम्यान असतो. मात्र, अंतराळात 14 दिवस वास्तव्य केल्याबद्दल त्यांना वेगळं मानधन मिळणार आहे, ज्याची रक्कम सुमारे ₹1,18,292 इतकी आहे.

या ऐतिहासिक मोहिमेच्या तयारीसाठी भारत सरकारकडून सुमारे ₹548 कोटींचा खर्च करण्यात आला आहे, ज्यामध्ये शुक्ला यांचं संपूर्ण प्रशिक्षण, तांत्रिक तयारी आणि लॉजिस्टिक यांचा समावेश आहे. हे अभियान भारत आणि अमेरिकेतील सहकार्याचं एक उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे.

शुभांशू शुक्ला यांचा हा प्रवास केवळ वैज्ञानिकदृष्ट्या नव्हे तर भारतीय अंतराळ इतिहासाच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचाठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!