घरात चोरी झाली, फोन हरवला, किंवा ओळखीची कागदपत्रं कुठे पडली तर अशा वेळी थेट पोलीस स्टेशनमध्ये जाणं हे अनेकांसाठी जरा त्रासदायक वाटू शकतं. पण आता काळ बदलतोय आणि पोलिसांची सेवा सुद्धा डिजिटल झाली आहे. दिल्लीत राहणाऱ्या नागरिकांसाठी तर ही एक मोठी दिलासादायक सुविधा आहे. कारण दिल्ली पोलिसांनी घरबसल्या एफआयआर दाखल करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

RIR म्हणजे काय?
कोणत्याही गुन्हेगारी घटनेनंतर, त्या संदर्भात पोलिसांकडे केलेली अधिकृत पहिली तक्रार म्हणजे ‘एफआयआर प्रथम माहिती अहवाल. यावरूनच गुन्ह्याची तपासणी सुरू होते. सामान्य भाषेत सांगायचं तर, हीच तक्रार अधिकृत चौकशीला सुरुवात करून देते.
दोन प्रकारचे गुन्हे असतात. एक म्हणजे दखलपात्र गुन्हे जसे की खून, बलात्कार, अपहरण, ज्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं. पण दुसऱ्या प्रकारात म्हणजे अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये तुम्ही घरातूनच तक्रार दाखल करू शकता.
दिल्ली पोलिसांनी यासाठी ‘ई-एफआयआर’ अॅप सुरू केलं आहे, जिथे तुम्ही काही मिनिटांत तक्रार दाखल करू शकता. शिवाय, अधिकृत वेबसाइटवरही हीच सुविधा उपलब्ध आहे. विशेषतः चोरी, सायबर गुन्हा, कागदपत्रं हरवणे, वाहन चोरी, घरगुती हिंसाचार यांसारख्या प्रकरणांमध्ये हे तंत्रज्ञान खूप उपयोगी पडतं.
E-FIR कशी कराल?
तुम्ही दिल्लीत राहणारे असाल, तर तुम्ही https://delhipolice.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा. ‘Citizen Services’ विभागात ‘eFIR’ हा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल जिथे ‘Create Citizen Login’ करून तुम्ही स्वतःचं अकाउंट तयार करू शकता.
नोंदणी पूर्ण झाल्यावर, तुम्हाला युजरनेम आणि पासवर्डने लॉगिन करावं लागेल. लॉगिन झाल्यावर एक फॉर्म उघडेल, जिथे तुमची माहितीनाव, पत्ता, संपर्क क्रमांक, घटनेचा तपशील हे सर्व विचारलं जाईल. सर्व माहिती अचूक भरल्यानंतर ‘Submit’ करा. तुमचा एफआयआर यशस्वीरीत्या नोंदवला जाईल आणि त्याचा क्रमांक तुम्हाला मिळेल, ज्याचा उपयोग नंतरच्या चौकशीत करता येतो.
यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, दहशतवाद, खून, बलात्कार, आत्महत्या, मोठा दरोडा यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये ऑनलाइन एफआयआर दाखल करता येत नाही. अशा प्रकरणांमध्ये तुम्हाला थेट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा लागतो.