काय सांगता? लंडनमधील 147 वर्ष जुने रॉयल हॉटेल मिळणार अवघ्या 1 पौंडमध्ये? भारतीयांनाही खरेदीची संधी! जाणून घ्या अधिक

Published on -

लंडनसारख्या महागड्या शहरात, एखादं आलिशान हॉटेल फक्त 117 रुपयांमध्ये विकत मिळतंय, असं ऐकलं तर कोणालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पण ही बातमी खरी आहे. हॉटेलचं नाव आहे “द रॉयल हॉटेल,” आणि ते खरोखरच 1 पाउंड म्हणजे जवळपास 117 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण या स्वप्नवत ऑफरच्या मागे एक वेगळीच कथा आहे ,जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

“द रॉयल हॉटेल”ची कहाणी

या हॉटेलची खरी कहाणी सुरू होते 2020 मध्ये, जेव्हा प्रॉपर्टी डेव्हलपर नैम पेमन यांनी हे ऐतिहासिक हॉटेल जवळपास 26 कोटी रुपयांना खरेदी केलं. त्यांच्या डोळ्यांत या वास्तूला नव्याने उभं करण्याचं स्वप्न होतं. त्यांनी यावर पुढील 12 कोटी रुपये खर्च करून काम सुरू केलं, पण कोविड महामारी, अर्थसंकट आणि बांधकाम खर्चात झालेली वाढ यामुळे प्रकल्प अर्धवट राहिला. नैम पेमन यांचं स्वप्न हॉटेलच्या भिंतीत अडकून राहिलं, आणि आता त्यांना या प्रकल्पातून माघार घ्यावी लागत आहे.

आज हे हॉटेल फक्त 1 पाउंड म्हणजे 117 रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आलं आहे. मात्र यात एक अट आहे, जो कोणी हे हॉटेल खरेदी करेल, त्याला उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी सुमारे 11 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागेल. म्हणजेच, ही एक सशर्त संधी आहे, नावावर हॉटेल मिळेल, पण त्याला पूर्ण रूप देण्यासाठी आर्थिक तयारी लागणारच.

मालकाने ठेवली विचित्र अट

हे हॉटेल 147 वर्षे जुने आहे, आणि इतिहासात खोल रुजलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे हे फक्त मालमत्ता खरेदीच नाही, तर एका वारशाची जबाबदारी घेणं आहे. अनेकांना हे आकर्षक वाटू शकतं. परदेशात स्वतःचं हॉटेल असावं, अशी एक भन्नाट कल्पना. पण या कल्पनेला हकीकत बनवण्यासाठी तुम्हाला 11 कोटीही तयार ठेवावे लागतील.

तुम्हीही या अनोख्या संधीचा फायदा घेऊ शकता. लिलाव ओपन मार्केटमध्ये होणार आहे. कोणालाही भाग घ्यायला बंदी नाही, पण तुम्ही जर ते विकत घेतलंत, तर तुम्हाला त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं, आर्थिक स्रोत आणि बांधकाम पूर्ण करण्याची योजना सादर करावी लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!