संकट आणखी वाढणार ! 29 जून 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचा वाईट काळ सुरु होणार

आज प्रेम, भौतिक सुख आणि धनसंपत्तीचा कारक म्हणून ज्या ग्रहाला ओळखले जाते तो ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. हो, आज शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे. यामुळे आजपासून काही राशीच्या लोकांचा संकटाचा काळ सुरू होऊ शकतो.

Published on -

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. जून महिन्यात देखील नवग्रहातील काही ग्रहांनी राशी आणि नक्षत्र परिवर्तन केले आहे. दरम्यान आजही एका महत्त्वाच्या ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे आणि याच राशी परिवर्तनाचा फटका राशीं चक्रातील तीन महत्त्वाच्या राशीच्या लोकांना बसू शकतो. 

कधी होणार शुक्र ग्रहाचे राशीं गोचर

पंचांगानुसार आज प्रेम, भौतिक सुख आणि धनसंपत्तीचा कारक असणारा शुक्र ग्रह राशी गोचर करणार आहे. 29 जून 2025 रोजी शुक्र ग्रह मेष राशी मधून बाहेर पडेल. सध्या शुक्र ग्रह मेष राशीमध्ये विराजमान असल्याने काही राशीच्या लोकांचे नशीब जोरात आहे.

पण आज शुक्र ग्रह मेष राशीमधून बाहेर पडेल आणि वृषभ राशी मध्ये जाणार आहे. मात्र शुक्र ग्रहाचे हे राशीं गोचर काही राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल तर काही राशीच्या लोकांसाठी खूपच चॅलेंजिंग राहणार आहे.

आता आपण या शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा राशी चक्रातील कोणत्या राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पाहायला मिळू शकतो याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. 

या राशीच्या लोकांसाठी संकटाचा काळ

मकर : 29 जून 2025 पासून या राशीच्या लोकांसाठी आव्हानाचा काळ सुरू होणार आहे. शुक्राचे गोचर झाल्यानंतर या लोकांचा आळशीपणा आणि निष्काळजीपणा वाढू शकतो. यामुळे या लोकांनी आळस बाजूला ठेवावा आणि आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट करावे.

इथे या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे यशासाठी केवळ नशिबावर अवलंबून न राहता प्रयत्न करत राहणे अत्यंत आवश्यक बाब आहे. या काळात हे लोक आपल्या मुलांसाठी अधिक चिंतेत राहतील.

या लोकांना अचानक आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणून खर्च करताना विशेष सावधानता बाळगणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास फायदा होईल नाहीतर पैशांची नासाडी होऊ शकते.

तुळ : मकर प्रमाणेच तूळ राशीच्या लोकांचा सुद्धा संकटाचा काळ आजपासून सुरू होईल अस आपण म्हणू शकतो. या लोकांना नोकरीच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ लोकांकडून टीका केली जाऊ शकते.

या काळात हे लोक मानसिक तणावात जाऊ शकतात. जे लोक सध्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. या काळात उसनवारीचे व्यवहार अजिबात करू नयेत. पण एक जमेची बाजू अशी की कुटुंबात चांगले वातावरण राहील.

मिथुन : मकर आणि तूळ राशी प्रमाणेच मिथुन राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ मोठा आव्हानाचा राहणार आहे. या काळात आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगावी. कारण की आर्थिक हानी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अनावश्यक खर्च अधिक होऊ शकतात म्हणून अनावश्यक खर्च शक्यतो टाळावेत. हा काळ असा आहे जिथे अनोळखी लोक तुमची फसवणूक करू शकतात म्हणून अनोळखी लोकांपासून अंतर ठेवावे.

आरोग्याच्या समस्या वाढू शकतात हेच कारण आहे की या काळात ज्योतिष तज्ञांनी आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी देण्याचा बहुमूल्य सल्ला दिलेला आहे.

उद्योग करणाऱ्या लोकांनी सुद्धा या काळात विशेष दक्ष राहणे आवश्यक आहे, विशेषतः परदेशी व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनी या काळात कोणताही व्यवहार करताना काळजी घ्यावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe