अंतराळात पाणीही तरंगतं, मग अंतराळवीर ब्रश किंवा अंघोळ कशी करतात? वाचा त्यांच्या जबरदस्त ट्रिक्स

Published on -

अंतराळात राहणं ही एक विलक्षण गोष्ट आहे, पण त्यामागे अनेक अडचणी आणि प्रश्न दडलेले असतात. पृथ्वीवर आपण ज्या गोष्टी सहज आणि स्वाभाविकपणे करतो, जसं की आंघोळ, केस धुणं, दात घासणं त्या सगळ्या गोष्टी अंतराळात अवघड होतात. कारण तिथे गुरुत्वाकर्षणच नाही. त्यामुळे पाणी हवेतच तरंगतं आणि जर तो पाण्याचा थेंब चुकीच्या ठिकाणी गेला तर यंत्रणांना धोका निर्माण होऊ शकतो. पण तरीही, अंतराळवीरांना आपलं शरीर, केस आणि कपडे स्वच्छ ठेवावेच लागते. मग ते हे कसं करतात?

भारताचे शुभांशू शुक्ला जेव्हा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले, तेव्हा त्यांच्या समोरही हीच आव्हानं होती. तिथं शॉवर नाही, बाथरूमचा ओळखीचा प्रकार नाही, आणि वर पाण्याची चणचण. मग शरीर स्वच्छ ठेवायचं कसं? अशी प्रश्न सर्वांनाच पडली आहेत.

अंघोळ करण्याची ट्रिक

अंतराळवीर त्यासाठी एका अतिशय सोप्या आणि हुशार मार्गाचा वापर करतात. ते एक ओला टॉवेल वापरतात, जो अल्कोहोल किंवा द्रव साबणात भिजवलेला असतो. हा टॉवेल अंगभर फिरवून शरीर स्वच्छ केलं जातं. मग एक कोरडा टॉवेल वापरून शरीर पुसतात. त्यामुळे ना पाण्याचा अपव्यय होतो, ना गोंधळ उडतो आणि शरीरही ताजंतवाने राहतं.

केस धुण्याची पद्धत

केस धुणं हा आणखी एक प्रश्न. पण त्यासाठीही अंतराळवीर वापरतात खास प्रकारचा ‘नो-रिन्स’ शॅम्पू म्हणजेच असा शॅम्पू जो पाणी न वापरता केस स्वच्छ करतो. तो केसांमध्ये चोळून नंतर टॉवेलने पुसून टाकला जातो. यामुळे केसही स्वच्छ राहतात आणि पाण्याची बचतही होते.

कधी कधी, थोडंसं पाणी अंगावर टाकावं लागतं, तेव्हा ते पाण्याचे थेंब एका प्रेशर मशीनच्या सहाय्याने त्वचेला चिकटवले जातात, जे पसरले जात नाहीत. मग ते टॉवेलने टिपले जातात. अशा रीतीने प्रत्येक थेंब जपून वापरला जातो.

कपड्यांचं काय, असं वाटेल ना? पण कपडे धुण्याची सुविधाच नसल्याने अंतराळवीर डिस्पोजेबल कपडे वापरतात. ते काही दिवसांनी बदलून त्या कपड्यांना विशेष पिशवीत बंद करून पृथ्वीवर परत पाठवले जाते.

दात घासण्याची पद्धत

आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे दात घासण्याची पद्धत. तिथे वापरली जाणारी टूथपेस्ट गिळता येते. त्यामुळे टाकायची गरज नाही. आणि पाणी नाहीच, त्यामुळेहाच योग्य पर्याय.

या सगळ्या पद्धती फक्त स्वच्छतेसाठी नाहीत, तर अंतराळवीरांच्या आरोग्यासाठीही खूप महत्त्वाच्या आहेत. तिथे जर एखादा जंतू पसरला, तर तो मोहीमेवर गंभीर परिणाम करू शकतो. म्हणूनच स्वच्छतेच्या या छोट्या, पण अत्यंत विचारपूर्वक निवडलेल्या उपायांनी संपूर्ण अंतराळ मोहिमेच्या यशात मोठा वाटा असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!