‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता वाढला ! 5 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी पण मिळणार

महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहोत. अशातच आता काही राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. 

Published on -

State Employee News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च 2025 मध्ये महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला. आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% इतका होता मात्र आता हा भत्ता 55% एवढा झाला असून याचा लाभ जानेवारी 2025 पासून दिला जातोय.

महत्त्वाची बाब अशी की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसांनी पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. जुलै 2025 पासून पुन्हा एकदा या संबंधित नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे.

दुसरीकडे केंद्र शासनाच्या धर्तीवर देशातील इतरही राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जात आहे. अशातच आता हरियाणा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हरियाणा राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे.

या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला

मिळालेल्या माहितीनुसार हरियाणा राज्यातील पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. सहाव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सहा टक्क्यांनी आणि पाचव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.

याआधी हरियाणाच्या सातव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एप्रिल महिन्यात दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. सातव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 55% इतका करण्यात आला होता.

दरम्यान आता सहाव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 6% वाढीसह 252 टक्क्यांवर पोहोचला आहे आणि पाचव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 11 टक्के वाढीसह 466 टक्क्यांवर पोहोचला आहे.

महत्त्वाची बाब अशी की ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने या संबंधित पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.

या संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना तब्बल पाच महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे. यामुळे हरियाणा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार

महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 55% इतका करण्यात आला आहे. पण अजून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढलेला नाही.

मात्र पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात या संदर्भातील निर्णय अपेक्षित आहे. यामुळे पुढील जुलै महिन्यात राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 53 टक्क्यांवरून 55% होतो का हे पाहणे विशेष खास राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!