Monsoon Picnic Spot : पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पाय आपसूक पर्यटन स्थळांकडे वळतात. दरवर्षी पावसाळ्यात राज्यभरातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. अनेक जण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केरळला फिरायला जाण्याचा प्लॅन बनवतात.
पण जर तुम्हाला या पावसाळ्यात पिकनिकला जायचे असेल आणि तुम्हाला महाराष्ट्रातीलच एखाद्या नयनरम्य ठिकाणाला भेट द्यायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.

कारण की आज आपण अशा एका ठिकाणाची माहिती पाहणार आहोत जे की सांगली जिल्ह्यात वसलेले आहे आणि या ठिकाणी तुम्ही भेट दिली तर तुम्हाला केरळचाही विसर पडणार आहे. हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि येथे पर्यटकांचे अलीकडे मोठ्या प्रमाणात वर्दळ सुद्धा पाहायला मिळत आहे.
हे आहे महाराष्ट्रातील दुसरे महाबळेश्वर
आम्ही ज्या पर्यटन स्थळाबाबत बोलत आहोत त्याला महाराष्ट्रातील दुसरे महाबळेश्वर म्हटले जाऊ शकते. हे ठिकाण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या शिरोळा तालुक्यात वसलेले आहे.
शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात गुढे पाचगणी पठार हेच ते लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. या पर्यटन स्थळाला मिनी महाबळेश्वर या नावाने सुद्धा ओळखले जाते. हे पठार उंचावर आहे आणि म्हणूनच येथून चांदोली धरणाचा व्ह्यू हा रोचक दिसतो.
अलीकडे या पिकनिक स्पॉटवर पर्यंटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. या ठिकाणी फक्त सांगली जिल्ह्यातीलच नाही तर दूरवरील पर्यटक भेटी देत आहेत. पर्यटकांमध्ये या पठाराचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे.
हे पठार चांदोली अभयारण्य लगत आहे. गुढ पाचगणी पठारावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली दिसते. येथील हिरवागार निसर्ग पाहता असे भासते की निसर्गाने हिरवा शालूच नेसलेला आहे.
या परिसरात तुम्हाला विविध प्राण्यांचा तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षांचा वावर पाहायला मिळेल. हिरव्यागार शालू ने नटलेले डोंगर, कडेकपारातील छोटे मोठे धबधबे, उतारा वर केली जाणारी शेती, येथील छोटे मोठे पानवठे हे सारं काही पाहण्यासारखे आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे सध्या या पठारावर जागोजागी फुलोत्सव सुरू झाला आहे. ज्याप्रमाणे कास पठारावर तुम्हाला बहुरंगी आणि वेगवेगळ्या प्रजातीची फुले पाहायला मिळतात तशीच फुले तुम्हाला या गुढे पाचगणी पठारावर देखील पाहायला मिळतील.
हेच कारण आहे की या ठिकाणाला मिनी महाबळेश्वर असे संबोधले जात आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण सांगली पासून अवघ्या 94 किलोमीटर अंतरावर आहे.
तसेच हे ठिकाण कोल्हापूर पासून 89 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांना वनडे ट्रिप साठी हे ठिकाण परफेक्ट ठरणार आहे.













