सापांची भीती वाटत असेल तर ‘या’ 3-4 पदार्थांचे तेल घरात ठेवा, साप तुमच्या घराशेजारी पण फिरकणार नाहीत !

सध्या पावसाळा सुरू आहे आणि यामुळे मानवी वस्तींमध्ये साप घुसण्याची भिती आहे. पावसाळा सुरू झाल्याने सर्पदंशाच्या घटना सुद्धा वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत आज आपण सापांना घरापासून दूर कसे ठेवायचे? याबाबतची माहिती पाहणार आहोत. 

Published on -

Snake Viral News : सध्या पावसाळ्याचा सिझन सुरू आहे आणि सगळीकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. या पावसाच्या दिवसांमध्ये मानवी वस्तीत साप घुसण्याची भीती सुद्धा आहे. खरे तर दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप चावण्याच्या घटना वाढतात. सर्पदंशामुळे आपल्या भारतात दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो.

यामुळे पावसाळा सुरू झाला की सापांची भीती वाटणे स्वाभाविक बनते. दरम्यान जर तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण अशा काही वस्तूंची माहिती पाहणार आहोत ज्याच्या वापराने सापांपासून सुरक्षित राहता येते.

या वस्तूंपासून साप नेहमीच लांब राहतो

अमोनिया : तज्ञ लोक सांगतात की अमोनियाचा वास सापांना अजिबात आवडत नाही. जर तुमच्या घराशेजारी सातत्याने साप निघत असतील, तुम्हाला सापांची प्रचंड भीती वाटत असेल तर तुम्ही एक किंवा दोन कप पाण्यात अमोनियाचे दोन तीन चमचे मिसळून एक द्रावण तयार करायला हवे.

हे द्रावण तुम्हाला ज्या ठिकाणी साप निघण्याची भीती वाटते त्या ठिकाणी तुम्ही शिंपडू शकता. अमोनियाचे हे द्रावण तुम्ही एखाद्या स्प्रे बाटलीमध्ये भरून ठेवू शकता आणि हवं त्या ठिकाणी तुम्ही हे द्रावण शिंपडू शकता.

याच्या वासामुळे साप तुमच्या घराच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीत. जर तुमच्या घराशेजारील अडचणीच्या जागेत साप घुसून बसलेले असतील तर ते याच्या वासामुळे दूर पळून जातील.

लवंग आणि दालचिनी तेल : आपल्या प्रत्येकाच्याच घरात लवंग आणि दालचिनी पाहायला मिळते. हे दोन्ही मसाल्याचे पदार्थ आहेत आणि स्वयंपाकात याचा वापर होतो. दरम्यान या दोन्ही मसाल्याच्या पदार्थांपासून तयार करण्यात आलेल्या तेलाचा वापर करून तुम्ही साप दूर पळवू शकता.

तज्ञ लोक सांगतात की लवंगाचे दोन चमचे तेल आणि दालचिनीचे दोन चमचे तेल घेऊन तीन कप पाण्यात मिसळून एक द्रावण तयार करा. मग हे द्रावण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून बागांमध्ये किंवा घराच्या अंगणात आणि परसबागेत शिंपडा असे केल्यास साप तुमच्या घरापासून लांब पळतील.

लसूण आणि कांद्याचे तेल : लसूण आणि कांदा तेलाचा वापर केल्यास साप लांब पळतात. असे सांगितले जाते की या दोन्ही पदार्थांच्या तेलात असे काही घटक आहेत जे की सापांना लांब पळवू शकतात.

खरे तर लसणाचा आणि कांद्याच्या तेलाचा वास सापांना सहन होत नाही. या दोन्ही पदार्थांचा तीव्र वास साप सहन करू शकत नाहीत आणि म्हणूनच या तेलाचा वापर केल्यास साप तुमच्या घराजवळ सुद्धा फिरकणार नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!