पुण्यात 11 किलोमीटर लांबीचा नवा मेट्रो मार्ग विकसित होणार ! ‘या’ भागातून जाणार, कसा असणार रूट ?

पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुण्याला दोन नव्या विस्तारित मेट्रो मार्गांची भेट मिळणार आहे. दरम्यान आज आपण याच विस्तारित मेट्रो मार्गांची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Pune Metro News : पुणेकरांच्या सोयीसाठी शहरातील मेट्रो मार्गांचा विस्तार केला जात आहे. सध्या पुण्यात दोन मेट्रो मार्ग सर्व सामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आले आहेत. महामेट्रोने पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू केली आहे.

दुसरीकडे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे. आगामी काळात हा देखील मेट्रो मार्ग पुणेकरांच्या सेवेत येणार आहे.

अशातच आता पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे पुण्याला आणखी दोन नव्या विस्तारित मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे आणि या दुसऱ्या टप्प्यात दोन नवीन विस्तारित मेट्रो मार्गांना केंद्रातील सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान आता आपण याच दुसऱ्या टप्प्यातील दोन्ही नव्या विस्तारित मेट्रो मार्गांची माहिती पाहणार आहोत. 

या मेट्रो मार्गांना मिळाली मंजुरी 

नुकत्याच काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारने पुणे मेट्रो लाईन 2 च्या वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित मेट्रो मार्गाला अखेर कार मंजुरी दिली आहे.

आता या दोन्ही मेट्रो मार्गांना मंजुरी मिळाली असल्याने लवकरच या मार्गांसाठी निविदा प्रक्रिया सुरू होऊ शकते अशी माहिती जाणकारांकडून दिली जात आहे.

अशा परिस्थितीत आता आपण वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली हे दोन्ही विस्तारित मेट्रो मार्ग नेमके कसे आहेत याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. 

कसा आहे रामवाडी वाघोली मेट्रो मार्ग प्रकल्प? 

रामवाडी वाघोली विस्तारित मेट्रोमार्ग प्रकल्प 11.63 किलोमीटर लांबीचा आहे आणि या मेट्रो मार्गावर एकूण 11 मेट्रोची स्थानके विकसित केली जाणार आहेत.

या मार्गावर विमान नगर, सोमनाथ नगर, खराडी बायपास, तुळजाभवानी, उबळे नगर, अप्पर खराडी रोड, वागळेश्वर टेम्पल, वाघोली स्टेशन, सिद्धार्थ नगर, बाकोरी फाटा आणि विठ्ठलवाडी ही 11 स्थानके या मार्गावर विकसित होणार आहेत. 

वनाज – चांदणी चौक मेट्रो मार्ग प्रकल्प कसा आहे?

हा मेट्रो मार्ग 1.12 किलोमीटर लांबीचा असून या मार्गावर एकूण दोन स्टेशन विकसित होणार आहेत. कोथरूड बस डेपो आणि चांदणी चौक ही दोन नवीन स्थानके या मार्गावर विकसित केली जाणार आहेत. यामुळे या संबंधित भागातील प्रवाशांना फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!