LPG Gas Cylinder Price : देशातील सर्व सामान्य नागरिकांसाठी विशेषतः एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय झाला आहे. LPG सिलेंडरच्या किमतीत तब्बल 60 रुपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे.
खरंतर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्यांकडून गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर केले जात असतात. आजही तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर केले आहेत. हे नवीन दर आज एक जुलै 2025 पासून लागू राहतील.

गॅस सिलेंडरचे रेट 60 रुपये यांनी झालेत कमी
आज तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 60 रुपयांनी कमी केल्या आहेत. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या महिन्यात सुद्धा कायम ठेवण्यात आल्या आहेत. म्हणजे 14.2 किलो वजनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत या महिन्यात देखील कोणताच बदल झालेला नाही.
नक्कीच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांना देखील अप्रत्यक्षरीत्या फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण गॅस सिलेंडरच्या लेटेस्ट किंमती पाहणार आहोत.
कशा आहेत गॅस सिलेंडरच्या लेटेस्ट किमती
आज मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1616 इतकी झाली आहे, जूनमध्ये ही किंमत 1674.50 होती आणि मे महिन्यात इथे व्यावसायिक गॅस सिलेंडर 1699 रुपयांना मिळत होता.
अर्थातच देशाच्या आर्थिक राजधानीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 58.50 रुपयांचे कपात करण्यात आली आहे. चेन्नईत मागील महिन्यात म्हणजेच जून महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर 1881 रुपयांना मिळत होता आता या ठिकाणी 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1823.50 रुपये एवढी झाली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्ली बाबत बोलायचं झालं तर येथे गेल्या महिन्यात 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1723.50 एवढी होते मात्र आता दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1665 रुपयांना मिळणार आहे, म्हणजे येथे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 58.50 रुपयांची कपात झाली आहे.
कोलकातामध्ये गेल्या महिन्यात 19 किलो सिलेंडरची किंमत 1826 रुपये होती मात्र आजपासून ही किंमत 1769 रुपये एवढी झाली आहे म्हणजेच इथे हा सिलेंडर 57 रुपये यांनी स्वस्त झाला आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कशा आहेत
मुंबई – 852.50
पुणे – 856
दिल्ली – 853
वाराणसी – 916.50
लखनौ – 890.50
हैदराबाद – 905
बेंगळुरू – 855.50
पटना – 942.50
आग्रा – 865.50
मेरठ – 860
गाझियाबाद – 850.50
इंदूर – 881
भोपाळ – 885.50
लुधियाना – 880