एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज! 1 जुलै 2025 पासून ‘या’ प्रवाशांना मिळणार तिकीट दरात 15% सवलत

महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एस टी महामंडळाने राज्यातील काही प्रवाशांसाठी तिकीट दरात 15 टक्के सवलत देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. दरम्यान आज आपण महामंडळाच्या याच नव्या योजनेची माहिती पाहणार आहोत.

Published on -

ST News : महाराष्ट्रातील लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आजपासून एका विशेष योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत एसटी महामंडळाच्या काही प्रवाशांना तिकीट दरात तब्बल पंधरा टक्के सवलत दिली जाणार आहे.

अशा परिस्थितीत आता आपण एसटी महामंडळाची ही योजना नेमकी काय आहे, कोणत्या प्रवाशांना तिकीट दरात सवलत मिळणार, याचा लाभ कधीपर्यंत घेता येणार या सर्व बाबींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एसटी महामंडळाची नवीन योजना काय आहे?

एसटी महामंडळाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या या नव्या योजनेबाबत बोलायचं झालं तर या नवीन योजनेअंतर्गत एसटीच्या लांब व मध्यम अंतराच्या बससेवेसाठी आगाऊ आरक्षण केलेल्या आणि पूर्ण भाडे भरणाऱ्या प्रवाशांना 15 टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे.

पण, 150 किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतर असणाऱ्या बससेवेसाठी ही सवलत लागू राहील. आधीपासूनच ज्या प्रवाशांना सवलत मिळते त्यांना याचा लाभ मिळणार नाही.

जे प्रवासी आरक्षण करताना संपूर्ण भाडे देतील त्यांनाच याचा लाभ मिळेल. ही योजना सर्व प्रकारच्या एसटी बससेवेसाठी म्हणजे सामान्य, सेमी लक्झरी, शिवशाही तसेच इतर बस सेवेसाठी सुद्धा लागू राहणार आहे.

ही सवलत फक्त नियमित बसेसला लागू राहणार आहे अतिरिक्त बसेससाठी ही सवलत लागू राहणार नाही. ई शिवनेरी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा ही सवलत लागू राहणार आहे. 

कधीपर्यंत सुरू राहणार ही नवीन योजना? 

मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आलेली ही नवीन योजना आज एक जुलै 2025 पासून लागू राहणार आहे. पण ही योजना उन्हाळी आणि दिवाळी या गजबजलेल्या काळात लागू राहणार नाही.

उर्वरित काळात मात्र ही नव्याने सुरू करण्यात आलेली योजना वर्षभर चालू राहणार आहे. नक्कीच या नव्या योजनेचा एसटीने प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांना, विशेषता जे प्रवासी दररोज लांब पल्ल्याचा प्रवास करतात अशा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि यासाठी आरक्षण करणार असाल तर तुम्ही एसटी डेपो मध्ये असणाऱ्या स्थानिक तिकीट खिडक्यांमधून आरक्षण करू शकतात याशिवाय ऑनलाइन पर्याय सुद्धा उपलब्ध आहे.

एसटीच्या अधिकृत संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन आरक्षण करू शकता. पण याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आरक्षण करताना पूर्ण भाडे भरावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!