महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठा बदल ! 1 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?

तुम्हीही आज सोने खरेदीसाठी सराफा बाजारात जाणार आहात का? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज एक जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 10 ग्रॅम सोन्याच्या किमती कशा आहेत याबाबत आता आपण माहिती पाहणार आहोत. 

Published on -

Gold Rate : सोन खरेदीच्या तयारीत आहात का? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत पुन्हा एक मोठा उलट फेर पाहायला मिळाला आहे. आज पुन्हा एकदा या मौल्यवान धातूच्या किमतीत मोठा बदल दिसतोय.

यामुळे सोन खरेदीला जाण्याआधी आजची ही बातमी तुम्ही पूर्ण वाचायला हवी. खरे तर गेल्या नऊ-दहा दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने घसरण होत होती. यामुळे एका लाखाच्या वर पोहोचलेल्या किमती 97 हजार रुपयांपर्यंत खाली आल्यात.

23 जून 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 690 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी होती. मात्र काल 30 जून 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.

पण आज जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच या मौल्यवान धातूच्या किमतीत 1140 रुपयांची वाढ झाली आहे. आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे किमतीत मोठी वाढ नमूद करण्यात आली असून आता आपण एक जुलै 2025 रोजीच्या या मौल्यवानी धातूची किंमत जाणून घेणार आहोत. 

10 ग्रॅम सोने खरेदीसाठी आता किती पैसे मोजावे लागणार ?

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या प्रमुख शहरांमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 860 रुपयांनी वाढून 73 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे.

तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 1050 रुपयांनी वाढून 90 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्राम एवढी झाली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत आज 1140 रुपयांनी वाढून 98 हजार चारशे रुपये इतकी झाली आहे.

नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या शहरांमधील सोन्याच्या लेटेस्ट किमती 

महाराष्ट्रातील या प्रमुख शहरांमध्ये आज 1 जुलै 2025 रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 860 रुपयांनी वाढून 73 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे.

तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 1080 रुपयांनी वाढून 90 हजार 230 रुपये प्रति दहा ग्राम एवढी झाली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत आज 1140 रुपयांनी वाढून 98 हजार 430 रुपये इतकी झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!