Top MBA College : ग्रॅज्युएशन नंतर एमबीएला ऍडमिशन घेणार असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. भारतातील सर्वोत्तम एमबीए महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. योग्य कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाले तर हे विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी फायद्याचे ठरते.
म्हणूनच आज आपण देशातील टॉप 4 एमबीए कॉलेजची माहिती पाहणार आहोत. जर विद्यार्थ्यांना या टॉपच्या एमबीए कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळाले तर त्यांचे करिअर खऱ्या अर्थाने सेट होणार आहे.

हे आहेत देशातील टॉप 4 MBA कॉलेज
IIM अहमदाबाद : हे देशातील एक प्रतिष्ठित एमबीए कॉलेज आहे. या कॉलेजमधून विद्यार्थ्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले तर त्यांचे आयुष्य नक्कीच सेट होईल. व्यवस्थापन पदव्युत्तर कार्यक्रम (PGP) हा IIM अहमदाबादच्या लोकप्रिय अभ्यासक्रमांपैकी एक आहे.
ज्या उमेदवारांनी 50% गुणांसह पदवी पूर्ण केली आहे आणि वैध CAT/GMAT गुण मिळवले आहेत ते IIM अहमदाबादमध्ये MBA प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. मात्र या कॉलेजची अंतिम निवड ही प्रवेश परीक्षेतील गुण, मागील शैक्षणिक कामगिरी, PI आणि इतर टप्प्यांवर अवलंबून असते.
या अभ्यासक्रमाची फी 26 लाख 50 हजार रुपये असेल, ज्यामध्ये 19 लाख 35 हजार रुपये ट्यूशन फी समाविष्ट आहे. ही कॉलेज मजबूत प्लेसमेंट रेकॉर्डसाठी ओळखली जाते.
या कॉलेजमधून MBA पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना 100% प्लेसमेंट मिळते. 2023 मध्ये या कॉलेजमधील एमबीएच्या विद्यार्थ्यांना वार्षिक 34.45 लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे.
FMS, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली : हे देखील देशातील एक प्रतिष्ठित एमबीए कॉलेज आहे. येथून एमबीए केलेल्या विद्यार्थ्यांचे करिअर खऱ्या अर्थाने सेट होते. जर तुम्हाला येथे ऍडमिशन मिळाले तर तुमच्या करिअरला एक नवीन दिशा मिळणार आहे.
2023 मध्ये येथून एमबीए केलेल्या विद्यार्थ्यांना 34.10 लाख रुपये वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली आहे. या कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्ड हा फारच उत्कृष्ट आहे.
IMI कोलकाता : आयएमआय कोलकाता हे देखील देशातील एक प्रमुख एमबीए कॉलेज आहे. येथील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम) हा एक लोकप्रिय अभ्यासक्रम आहे. पदवीमध्ये 50% गुण आणि कॅट/एक्सएटी/सीएमएटी/जीएमएटी स्कोअर असलेले पदवीधर यासाठी अर्ज करू शकतात.
विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेतील गुण, पीआय, कामाचा अनुभव इत्यादीं बाबींवर या महाविद्यालयात प्रवेश मिळतो. या कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्ड फारच छान आहे. 2024 मध्ये या कॉलेजमधून पास आऊट झालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी बारा लाख रुपये पॅकेजची नोकरी मिळाली आहे.
SPJIMR, मुंबई : हे देखील भारतातील एक उत्कृष्ट एमबीए कॉलेज आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (PGDM) हा एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SPJIMR) या कॉलेजचा एक लोकप्रिय MBA अभ्यासक्रमांपैकी एक आहे.
ज्या उमेदवारांनी किमान 50% गुणांसह पदवी पूर्ण केली आहे आणि चांगला CAT/GMAT स्कोअर मिळवला आहेत त्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकतो. येथून पास आऊट झालेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळते.