Bank Of Baroda FD Scheme : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी आजची बातमी कामाची राहणार आहे विशेषता ज्यांना बँक ऑफ बडोदाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक महत्त्वाची राहणार आहे.
खरे तर, गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयकडून रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. आरबीआयने गेल्या काही महिन्यात रेपो रेटमध्ये एक टक्क्यांची कपात केली आहे.

याचा परिणाम म्हणून देशभरातील विविध बँकांकडून एफडीचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत एफडी मध्ये गुंतवणूक करण्याआधी ग्राहकांनी व्याजदराची तुलना करणे आवश्यक आहे. म्हणून आज आपण बँक ऑफ बडोदा च्या 444 दिवसांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.
या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना काय दराने व्याज मिळणार, तसेच जर या योजनेत 4 लाखांची गुंतवणूक झाली तर किती रिटर्न मिळणार ? याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन आज आपण या लेखातून समजून घेणार आहोत.
बँक ऑफ बडोदाची 444 दिवसांची एफडी योजना कशी आहे ?
बँक ऑफ बडोदाकडून नियमित एफडी योजनांप्रमाणेच काही विशेष FD योजना सुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत. बँक ऑफ बडोदा ने 444 दिवसांची बँक ऑफ बडोदा स्क्वायर ड्राईव्ह डिपॉझिट स्कीम सुरू केली आहे.
या एफ डी योजनेत सध्या स्थितीला सामान्य ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या ग्राहकांना 6.60% दराने व्याज दिले जात आहे तसेच ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ग्राहकांना 7.10 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
नक्कीच जर तुम्हाला तुमच्या घरातील जेष्ठ नागरिक ग्राहकांच्या नावाने एफडी करायची असेल तर या बँकेची ही एफडी योजना तुमच्यासाठी एक फायद्याचा पर्याय ठरणार आहे.
4 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न ?
बँक ऑफ बडोदाच्या या स्पेशल एफडी योजनेत जर एखाद्या ग्राहकाने चार लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला सध्याच्या 6.60% दराने चार लाख 32 हजार 340 रुपये मिळणार आहेत. अर्थातच 32 हजार 340 रुपये संबंधित ग्राहकाला व्याज म्हणून रिटर्न मिळतील.
जर समजा बँक ऑफ बडोदाच्या स्पेशल एफडी स्कीम मध्ये एखाद्या जेष्ठ नागरिक ग्राहकाने चार लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना 7.10% दराने 4 लाख 34 हजार 807 रुपये मिळणार आहेत. अर्थातच ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना चार लाखांच्या गुंतवणुकीतून 34,807 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.