अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरकरांसाठी गुड न्यूज ! नगरमधील ‘या’ भागात फक्त 5 लाखात घर मिळणार ! म्हाडाची लॉटरी जाहीर

अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, बीडमध्ये घर खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. म्हाडा कडून या भागातील घरांसाठी नुकतीच लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

Published on -

Mhada News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर अशा शहरांमध्ये स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न पाहणारे बहुतांशी लोक म्हाडाच्या घरांची वाट पाहत असतात.

दरम्यान सध्याच्या या महागाईच्या काळाच्या लोकांना घर घेणे परवडत नाही अशा लोकांसाठी म्हाडा कडून एक गुड न्यूज समोर आली आहे.

म्हाडाने नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर विभागासाठी नुकतीच लॉटरी जाहीर केली असून यामुळे हजारो लोकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

दरम्यान आता आपण नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या या लॉटरी बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.

कशी आहे नाशिक विभागातील लॉटरी?

म्हाडा ने नाशिक विभागातील 1485 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या अंतर्गत वडाळा शिवारमधील पार्श्वनाथ प्रोजेक्ट या ठिकाणी एलआयजी म्हणजे अल्प उत्पन्न गटासाठी 12.68 लाख ते 13.55 लाख या किंमतीत घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

अडगाव शिवारमधील प्रणव गार्डनमध्येही अल्प उत्पन्न गटासाठी 11.94 लाख ते 15.31 लाख या किमतीत घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या लॉटरीच्या माध्यमातून अहिल्यानगरमधील सिव्हिल हुडको,

सावेदी या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी फक्त 5.48 लाख रुपयांच्या किमतीत घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या घरांसाठी दोन दिवसांपासून म्हणजेच 30 जून 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक 11 ऑगस्ट 2025 आहे.

मात्र अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी 12 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.तसेच 18 ऑगस्टला अधिकृत संकेतस्थळावर अर्जांची यादी प्रसिद्ध होईल आणि 25 ऑगस्टला अंतिम पात्र अर्जदारांची यादी जाहीर होणार आहे.

संभाजीनगर विभागातील लॉटरी कशी आहे?

छत्रपती संभाजी नगर विभागातील 1351 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरीच्या माध्यमातून नक्षत्रवाडीमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1056 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,

ज्यांची किंमत 15.30 लाख प्रति सदनिका इतकी आहे. चिखलठाणा येथे 158 घरे उपलब्ध झाली आहेत, या घरांची किंमत 27 लाख रुपये आहे. चिखलठाणा येथे आणखी सहा घरे आहेत ज्यांची किंमत 34 लाख रुपये आहे.

देवळाई मध्ये 14 घर उपलब्ध करून देण्यात आली आहेत, ज्यांची किंमत 13.19 लाख ते 16.19 लाख इतकी आहे. या लॉटरीच्या माध्यमातून आनंद पार्कमध्ये 18 घरे उपलब्ध झाली आहेत ज्यांची किंमत 4.85 ते 6.27 लाख इतकी ठेवण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील 92 घरे या लॉटरीमध्ये समाविष्ट आहेत आणि या घरांची किंमत 10.65 लाख इतकी आहे. या घरांसाठी सुद्धा 30 जून पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि 11 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!