अहिल्यानगरच्या फळबाजारात डाळिंबाला प्रतिक्विंटल १६ हजार रुपयांपर्यंत भाव, सफरचंदाने गाठला २४ हजारांचा टप्पा

अहिल्यानगर बाजार समितीत मंगळवारी ३२६ क्विंटल फळांची आवक झाली. डाळिंबांना १६ हजार, सफरचंदांना २४ हजार, तर जांभळांना १० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. आंब्यांच्या विविध प्रकारांनाही समाधानकारक दर मिळाले.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. बाजार समितीत मंगळवारी ३२६ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यावेळी सफरचंदाला प्रतिक्विंटल २४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी डाळिंबांची ३३ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची १८ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते ७००० रुपये भाव मिळाला. संत्र्यांची १ क्विंटलवर आवक झाली होती. संत्र्यांना २ ते ८ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. पपईची १६ क्विंटल आवक झाली होती. पपईला ५०० ते २५०० रुपये भाव मिळाला. अननसाची ४ क्विंटलवर आवक झाली होती. 

सफरचंदाला १० हजार ते २४ हजार रुपयांपर्यंत भाव

यावेळी अननसाला प्रतिक्विंटल १६०० ते ५००० रुपये भाव मिळाला. सफरचंदाची ७ क्विंटल आवक झाली होती. सफरचंदाला १० हजार ते २४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. पेरूची १२ क्विंटल आवक झाली होती. पेरूला १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. बदाम आंब्याची १०९ क्विंटल आवक झाली होती. बदाम आंब्यांना प्रतिक्विंटल ३५०० ते ४००० रुपये भाव मिळाला. 

केशर आंब्याची २८ क्विंटल आवक 

केशर आंब्याची २८ क्विंटल आवक झाली होती. केशरला प्रतिक्विंटल ४ हजार ते ७हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. तोतापुरी आंब्यांची २४ क्विंटल आवक झाली. तोतापुरीला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये भाव मिळाला. लंगडा आंब्याची १ क्विंटल आवक झाली होती. लंगडा आंब्याला ३७०० रुपये भाव मिळाला. दशेरी आंब्याची ६ क्विंटल आवक झाली होती. दशेरी आंब्यांना प्रतिक्विंटल ३७०० रुपये भाव मिळाला.

जांभळांना मिळाला १० हजार रुपयांपर्यंत भाव

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी जांभळाची ११ क्विंटलवर आवक झाली होती. यावेळी जांभळाला प्रतिक्विंटल ४००० ते १०००० रुपये भाव मिळाला. नीलम आंब्याची ६ क्विंटल आवक झाली होती. निलम आंब्यांना प्रतिक्विंटल २८०० रुपये भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!