Richest City : भारतातील हजारो शहरे आहेत आणि देशातील प्रत्येक शहर त्याच्या वेगवेगळ्या महत्त्वासाठी ओळखले जाते. देशभरातील शहरे देशाच्या एकात्मिक विकासात एक महत्त्वाची भूमिका निभावत आहे. देशातील काही शहरे सांस्कृतिक वारसा म्हणून प्रसिद्ध आहेत जसे की पुणे.
तसेच काही अशी शहरे असे आहेत जे की शिक्षणाचे गड समजले जातात जसे की, दिल्ली, पुणे, जयपुर. खरे तर कोणत्याही शहराच्या विकासात केवळ सरकारची भागीदारीच महत्त्वाची असते असे नाही तर त्या शहराच्या विकासात तेथील सामान्य जनतेचेही महत्त्वाचे योगदान असते.

दरम्यान आज आपण देशातील अशा एका शहराची माहिती जाणून घेणार आहोत जे की श्रीमंती साठी ओळखले जाते. या शहराने हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. हजारो लोकांचे स्वप्न या शहरात पूर्ण झाली आहेत.
आम्ही ज्या शहराबाबत बोलत आहोत ते शहर मुंबईला सुद्धा टक्कर देते. खरे तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी सुद्धा आहे.
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबई शहराचा मोठा सिंहाचा वाटा आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोक मुंबई शहरातच वास्तव्याला आहेत. दरम्यान, याच मुंबई शहराला मध्य प्रदेश राज्यातील एक शहर जोरदार टक्कर देत आहे.
हे आहे मध्य प्रदेश मधील सर्वाधिक श्रीमंत शहर
मध्यप्रदेश मधील इंदोर हे शहर मध्यप्रदेश राज्यातील श्रीमंत शहरांपैकी एक आहे. या शहरात मध्य प्रदेश राज्यातील सर्वाधिक श्रीमंत लोक वास्तव्याला आहेत. खरे तर भारताच्या मध्यभागी स्थित असणारे मध्य प्रदेश राज्याला भारताचे हृदय म्हणूनही ओळखले जाते.
या शहराला मध्यप्रदेश राज्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जात आहे. मुंबई तशी भारताची आर्थिक राजधानी आहे त्याचप्रमाणे इंदोर हे देखील मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
या शहराची संस्कृती, ऐतिहासिक वारसा या शहराला इतर शहरांपेक्षा अधिक आकर्षक आणि वेगळे बनवते. हे शहर स्वच्छतेसाठी संपूर्ण देशात ख्यातीप्राप्त आहे. येथील लोक सर्वाधिक कमाई करतात, या शहरातील एक व्यक्ती सरासरी 1.58 लाख रुपयांची कमाई करत आहे.
उद्योग आणि शिक्षणात अग्रेसर
या शहरात अशा काही बाजारपेठ उपलब्ध आहेत जिथे सर्वसामान्य लोकांना स्वस्त आणि महागडे कपडे उपलब्ध होतात. लोकांना येथील दर्जा आणि डिझाइन खूप आवडते. याशिवाय, शहरात इतरही असंख्य व्यवसाय आहेत. येथे व्यवसाय, वित्त आणि उद्योगांची कोणतीच कमतरता नाही.
हे शहर सतत विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. येथील लोकांना लहानात लहान सुविधा उपलब्ध असूनही त्यांना जास्त काळजी करण्याची गरज भासत नाही. इंदोरमध्ये सर्व धर्म, भाषा आणि संस्कृतींचा आदर करणारे लोक वास्तव्याला आहेत.
सर्वधर्म समभावाने चालणारे हे शहर शिक्षणासाठी देखील विशेष प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मध्य प्रदेश मधील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. बाहेर राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या देखील इथे खूपच अधिक आहे.
या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा अधिक आहे. येथील कोचिंग सेंटर संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहेत. येथील पोह्याचा नाष्टा हा देखील जगप्रसिद्ध आहे आणि येथे येणारे पर्यटक आवर्जून या नाश्त्याचा स्वाद घेतात.