जुलैचा महिना तंत्रज्ञानप्रेमींसाठी खास ठरणार आहे. या महिन्यात एकामागून एक जबरदस्त स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहेत. अशात तुम्ही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर जुलैमध्ये तुमच्यासाठी खूप काही खास असणार आहे. OnePlus, Motorola, Samsung, Oppo यांसारख्या दिग्गज ब्रँड्सकडून दमदार डिव्हाइसची लाँचिंग जुलैमध्ये होणार आहे.
OnePlus Nord 5

OnePlus आपली बहुप्रतीक्षित Nord 5 सिरीज जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सादर करणार आहे. या फोनमध्ये 6.74 इंचाचा AMOLED डिस्प्ले, 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट असणार आहे. Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसरमुळे गेमिंग आणि मल्टीटास्किंगचा अनुभव एकदम सुरळीत होईल. 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, 32MP फ्रंट कॅमेरा, 5,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह हा फोन जवळपास ₹35,000 पासून सुरू होईल.
Galaxy Z Fold 7
Samsung च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी म्हणजे Galaxy Z Fold 7. फोल्डिंग डिव्हाइसमध्ये क्रांती घडवणारा हा फोन जुलैच्या अखेरीस येणार आहे. 8 इंचाचा इनर AMOLED डिस्प्ले आणि 6.5 इंचाचा कव्हर डिस्प्ले यामध्ये मिळेल. Snapdragon 8 Gen 3, 12GB RAM, 1TB स्टोरेज आणि 200MP चा मेन कॅमेरा यामुळे हा फोन सुपर-प्रीमियम सेगमेंटमध्ये स्थान मिळवेल. किंमत सुमारे ₹1.5 लाख असण्याची शक्यता आहे.
Realme GT Neo 7
Realme GT Neo 7 देखील जुलैमध्ये धमाका करणार आहे. 6.78 इंच AMOLED डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट, MediaTek Dimensity 9350 प्रोसेसर, 50MP OIS कॅमेरा आणि 5,500mAh बॅटरीसह 100W फास्ट चार्जिंग हे सगळं मिळणार आहे. गेमिंगसाठी आणि वेगवान कामगिरीसाठी हा फोन उत्कृष्ट ठरेल. याची सुरुवातीची किंमत ₹35,000 च्या आसपास राहू शकते.
AI+ Nova 5G आणि AI+ Pulse 4G
स्वस्त आणि दमदार फोन पाहणाऱ्यांसाठी AI+ Nova 5G आणि AI+ Pulse 4G हे दोन्ही फोन 8 जुलै रोजी येणार आहेत. खास फ्लिपकार्टसाठी तयार केलेले हे फोन पूर्णपणे मेड-इन-इंडिया दृष्टिकोनातून सादर करण्यात येणार आहेत. ₹5,000 च्या किमतीतही 5G अनुभव देणारे हे डिव्हाइस Android 15 वर आधारित NXtQuantum OS वर चालतात.
Moto G96 5G
Motorola चा Moto G96 5G फोन 9 जुलै रोजी लाँच होणार आहे. यामध्ये 50MP Sony Lytia 700C प्राइमरी कॅमेरा असेल, ज्यामध्ये OIS सपोर्ट मिळेल. फोनचे डिझाईन प्रीमियम असेल आणि चार आकर्षक रंगांमध्ये येईल.
Oppo Reno 14
Oppo देखील मागे नाही. 3 जुलै रोजी Reno 14 सिरीज भारतात दाखल होणार आहे. Ultra Slim Body (7.48mm), IP68 आणि IP69 रेटिंग, 6.83 इंच AMOLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 8450 प्रोसेसर, आणि 50MP फ्रंट व रियर कॅमेरा हे या फोनचे वैशिष्ट्य आहे. अमेझॉनवरून या सिरीजची विक्री सुरू होणार आहे.