PPF योजनेत 12 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 40 लाख रुपये ! कशी आहे योजना? वाचा…

सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या सरकारी बचत योजनेची माहिती पाहणार आहोत.

Published on -

PPF Scheme : तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर, गेल्या काही महिन्यांच्या काळात आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे.

आरबीआयने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये तब्बल एक टक्क्यांची कपात केली आहे. दरम्यान आरबीआयच्या या निर्णयानंतर देशभरातील बँकांनी फिक्स डिपॉजिटचे व्याजदर कमी केले आहेत.

मात्र आजही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ योजनेचे व्याजदर कायम आहेत. त्यामुळे जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर पब्लिक प्रॉडक्ट फंड हा पर्याय तुमच्यासाठी फेस ठरणार आहे.

दरम्यान आता आपण पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत दर महा 12 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रुपये रिटर्न मिळणार याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. 

पीपीएफ योजनेचे व्याजदर कसे आहेत?

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक सरकारी योजना आहे. ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला 7.10% दराने परतावा मिळतोय.

त्यामुळे ही स्मॉल सेविंग स्किम गुंतवणूकदारांमध्ये अधिक लोकप्रिय बनली आहे. पब्लिक प्रोविडेंट फंड योजनेबाबत बोलायचं झालं तर यात वार्षिक किमान 500 रुपये आणि कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते.

म्हणजेच या योजनेत मासिक जास्तीत जास्त 12,500 रुपयांची गुंतवणूक करता येणे शक्य आहे. ही योजना पंधरा वर्षांसाठीची आहे म्हणजेच 15 वर्षात ही योजना परिपक्व होते. 

वार्षिक दीड लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार 

पब्लिक प्रॉव्हिड अँड फंड योजनेत धर्मा 12500 रुपयांची म्हणजेच वार्षिक दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटी वर म्हणजेच पंधरा वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर 40.6 लाख रुपये मिळतात.

यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक 22 लाख 50 हजार रुपये इतकी असते आणि उर्वरित रक्कम ही व्याज स्वरूपात गुंतवणूकदाराला रिटर्न मिळते.

त्यामुळे जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसाठी स्मॉल सेविंग स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्यासाठी या योजनेचा पर्याय सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. दरम्यान या पीपीएफचे एक मोठे वैशिष्ट्य आहे ते ही योजना ईईई कर-लाभ गुंतवणूक पर्याया अंतर्गत येते.

याचा अर्थ असा की, गुंतवणूकदाराला त्याच्या योगदानाच्या रकमेवर कोणताही कर लागत नाही. तसेच ठेवीच्या व्याजाच्या रकमेवर कोणताही कर नाही आणि शेवटी तुमच्या परिपक्वतेच्या रकमेवरही कोणताही कर लागत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!