येत्या 3 दिवसांत विनाशकारी त्सुनामी जग नष्ट करणार?, जपानी बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने सर्वत्र खळबळ!

Published on -

जपानमधील सामान्य नागरिक सध्या एका अनामिक भीतीच्या सावटाखाली दिवस काढत आहेत. शहरं नेहमीप्रमाणे गजबजलेली असली, दुकानं उघडी असली आणि रस्त्यांवर वाहतूक सुरू असली, तरीही लोकांच्या चेहऱ्यांवर एक गूढ काळजी स्पष्ट दिसते आहे. ही चिंता केवळ भूकंपाच्या सतत येणाऱ्या धक्क्यांमुळे नसून, ती जपानमध्ये 5 जुलै 2025 रोजी घडू शकणाऱ्या संभाव्य प्रलयासंबंधी आहे, ज्याची भविष्यवाणी एका मंगा कलाकाराने अगदी वर्षांपूर्वीच केली होती.

रियो तात्सुकीचे धक्कादायक भाकीत

रियो तात्सुकी नावाचा हा कलाकार, केवळ चित्रकथांसाठीच नव्हे तर त्याच्या कथित भविष्यवाण्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या ‘द फ्युचर आय सॉ’ या पुस्तकात अनेक धक्कादायक घटनांची पूर्वसूचना दिली होती ज्यामध्ये 2011 मधील त्सुनामी, कोरोना महामारी आणि अगदी राजघराण्याशी संबंधित घटनाही समाविष्ट होत्या. त्यामुळे त्याने जपानमध्ये 5 जुलै रोजी प्रलयंकारी त्सुनामी येईल, असा दावा केल्यापासून नागरिकांच्या मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

या भविष्यवाणीनं लोकांचं मानसिक जगच ढवळून निघालं आहे. प्रवास करणारे, पर्यटनाच्या योजना आखणारे आणि अगदी सामान्य जीवन जगणाऱ्या अनेक लोकांनी आपापले प्लॅन रद्द केले आहेत. विमान कंपन्यांपासून हॉटेल उद्योगापर्यंत सर्वत्र याचा परिणाम जाणवू लागला आहे. दक्षिण जपानमधील टोकारा बेटसाखळीतील अकुसेकिजिमा नावाचं एक छोटंसं बेट सध्या या भीतीचं केंद्र बनलं आहे, कारण तिथं 21 जूनपासून 736 पेक्षा अधिक भूकंपांचे सौम्य ते तीव्र झटके जाणवले गेले आहेत. यातील काही इतके तीव्र होते की स्थानिकांनी थरथरत्या जमिनीचा अनुभव प्रत्यक्ष घेतला.

अकुसेकिजिमा बेटावर भूकंपाचे धक्के

हे बेट समुद्रसपाटीपासून सुमारे 150 मीटर उंचावर आहे आणि ज्वालामुखी क्रियाशील क्षेत्रात येतं. त्याची भौगोलिक स्थिती पाहता, अशा ठिकाणी भूकंपाचं प्रमाण थोडं जास्त असणं अपेक्षित असतं. पण इतक्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या हालचालींनी स्थानिक लोकांची झोप उडवली आहे. या बेटावर जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आठवड्यातून फक्त दोनदा धावणारी एक फेरी सेवा, जी एका दिशेने तब्बल 10 तासांचा वेळ घेते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवणं किंवा सुरक्षिततेसाठी स्थलांतर करणं जवळपास अशक्य ठरतं.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, रियो तात्सुकीने वर्तवलेलं भाकीत अधिकच चर्चेत आलं आहे, कारण जमिनीखालची हालचाल तर सुरूच आहे. जपानमधील हवामानशास्त्र संस्था आणि भूकंप तज्ज्ञ याविषयी फारसं बोलत नाहीत, कदाचित ते हे नैसर्गिक प्रक्रियेचा भाग मानत असतील. पण ज्यांनी 2011 च्या त्सुनामीचं तांडव पाहिला आहे, त्यांच्या मनात आजही त्या दिवसांच्या आठवणी ताज्या आहेत. त्यामुळेच कोणताही धोका टाळण्यासाठी लोक सावध राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!