‘या’ दोन नामाक्षरांच्या लोकांनी कधीच एकमेकांसोबत लग्न करू नये, अन्यथा आयुष्यभर होईल पश्चात्ताप!

Published on -

कधी-कधी एखाद्या व्यक्तीसोबत अगदी सुरुवातीपासूनच पटत नाही किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत सतत किरकोळ वाद, भांडणं आणि गैरसमज यांचा अनुभव येतो. यामागे तुमचं आणि त्यांच्या नावाचं पहिलं अक्षर यात काही संबंध असू शकतो, असं म्हणणं काही लोकांना गमतीशीर वाटेल. पण ज्योतिषशास्त्र आणि नामशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर, नावाचं पहिलं अक्षर हे केवळ ओळख सांगणारं नसतं, ते व्यक्तिमत्त्व, स्वभाव आणि नात्यांची गती ठरवणारा एक महत्त्वाचा संकेत असतो.

‘B’ नामाक्षराचा खरा स्वभाव

याच दृष्टिकोनातून जेव्हा ‘B’ आणि ‘N’ या दोन अक्षरांची तुलना केली जाते, तेव्हा एक अत्यंत उत्सुकतादायक नातेसंबंध समोर येतो. ‘B’ ने नाव असलेल्या व्यक्तींचा स्वभाव सहसा धडाडीचा, उत्साही आणि आत्मविश्वासाने भरलेला असतो. त्यांना पुढे जायचं असतं, नेतृत्व करायचं असतं आणि बहुतेक वेळा ते आपल्या मतावर ठाम असतात. ते कठोर परिश्रम करणारे असले तरी कधी कधी त्यांचा हट्ट आणि अहंभाव नात्यांमध्ये तणाव निर्माण करतो.

‘N’ नामाक्षराचा खरा स्वभाव

दुसरीकडे, ‘N’ या अक्षराने नाव असलेल्या लोकांचा स्वभाव याच्या अगदी विरुद्ध असतो. हे लोक शांत, संयमी आणि विचारपूर्वक वागणारे असतात. ते बऱ्याचदा आपल्या भावना आत ठेवतात, सर्जनशील असतात आणि सहानुभूतीने इतरांशी वागतात. पण त्यांच्या लाजाळूपणामुळे आणि कधी-कधी निर्णय घेण्यात होणाऱ्या अडचणीमुळे, ते स्वतःच अडकतात आणि दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून ‘अन्‌प्रेडिक्टेबल’ वाटू शकतात.

‘B’ आणि ‘N’ चे नाते

जेव्हा ‘B’ आणि ‘N’ या दोन व्यक्तिमत्त्वांचे नाते जुळते, तेव्हा सुरुवातीला ती एक चांगली जोडी वाटते, उत्साही आणि संयमाचा सुंदर समतोल. पण जसजसे हे नातं पुढे जातं, तसतशी त्यांच्या मूळ प्रवृत्तींमधील तफावत समोर यायला लागते. ‘B’ व्यक्ती थेटपणे बोलते, तर ‘N’ व्यक्ती अनेक गोष्टी मनात ठेवते. एकाला लगेच उत्तर हवं असतं, दुसरा विचार करत बसतो. आणि हेच असमतोल वादाच्या, गैरसमजांच्या आणि भांडणांच्या रूपात व्यक्त होतो.

मात्र, इतकं सगळं असूनही ही जोडी अगदी सहज तुटत नाही. त्यांच्यात प्रेम असतं, आपुलकी असते आणि एकमेकांबद्दल आकर्षण असतं. म्हणूनच या छोट्या-मोठ्या भांडणांनंतरही नातं टिकतं, आणि कधीकधी आणखी मजबूतही होतं. कारण ‘B’ व्यक्ती जरी जास्त बोलकी आणि हट्टी असली, तरी ‘N’ व्यक्तीच्या संयमामुळे अनेकदा वाद टळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!