Maharashtra Schools : गेल्या महिन्यात अर्थातच जून महिन्याचे क्षणिक वर्ष 2025 – 26 ची सुरुवात झाली. 15 जून 2025 पासून नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवात झाली आहे. दरम्यान या नव्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील अनेक शाळांमधील पटसंख्या कमी झाली आहे.
काही शाळांमधील पटसंख्या वीस पेक्षा कमी आहे आणि यामुळे या कमी पटसंख्येच्या शाळा आता बंद केल्या जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत.

दरम्यान आता याच संदर्भात सरकारकडून पावसाळी अधिवेशनात मोठी माहिती देण्यात आली आहे. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
पावसाळी अधिवेशनात मांडली लक्षवेधी
सोमवारपासून राजधानी मुंबईत पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान या पावसाळी अधिवेशनात आमदार विक्रम काळे यांनी राज्यातील सरकारी, जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळ बंद केल्या जात असल्याने शिक्षकांचे समायोजन संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.
यावर बोलताना सरकारकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद केल्या जाणार नाहीत अशी ग्वाही दिली आहे.
शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सुद्धा आतापर्यंत सरकारने कोणतेही शाळा कमी पटसंख्येच्या आधारावर बंद केली नसल्याचे सभागृहाला कळवले आहे.
अठरा हजार शाळांमध्ये कमी गट संख्या
महाराष्ट्रातील जवळपास 18000 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे. खरंतर राज्यात एकूण 1 लाख 8 हजार शाळा आहेत. त्यापैकी 18 हजार शाळांमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या असल्याची नोंद करण्यात आली आहे.
यामुळे अनेकांच्या माध्यमातून 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद केल्या जातील की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. पण आता अखेर कार सरकारने या संदर्भात आपली भूमिका क्लियर केली आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जवळपास 18000 शाळांमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे पण तरी देखील त्या शाळा सुरु राहणार असून त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाईल अशा आश्वासन पावसाळी अधिवेशन दरम्यान सभागृहाला दिले आहे.
तसेच ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची देखील माहिती यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी दिली.