Home Loan News : यंदाचे वर्ष होम लोन घेणाऱ्यांसाठी अधिक खास ठरत आहे. कारण म्हणजे यावर्षी होम लोन च्या व्याजदरात 1% पर्यंत कपात झाली आहे. देशभरातील विविध बँकांकडून होम लोनचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. हा निर्णय आरबीआयच्या रेपो रेट मधील कपातीच्या निर्णयानंतर देण्यात आला आहे.
आरबीआय ने रेपो रेटमध्ये गेल्या काही महिन्यांच्या काळात एक टक्क्यांची कपात केली आणि यानंतर देशभरातील बँकांनी होम लोन सहित सर्वच प्रकारच्या कर्जांच्या व्याजदर कपात केली आहे. यासोबतच एफ डी व्याजदरात देखील कपात करण्यात आली आहे.

यामुळे कर्ज घेतलेल्या ग्राहकांना या निर्णयाचा फायदा झाला आहे तर दुसरीकडे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसतोय. यामुळे सध्याचा काळ हा होम लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी फायद्याचा ठरतोय.
दरम्यान जर तुम्हालाही होम लोन घ्यायच असेल तर तुमच्यासाठी एसबीआयचा पर्याय बेस्ट राहणार आहे कारण की एसबीआय आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे.
एसबीआय होम लोनचे व्याजदर
एसबीआय आपल्या ग्राहकांना किमान 7.50% व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. एसबीआयने अलीकडे आपल्या होम लोन च्या व्याजदरात कपात केली आहे.
यामुळे जर तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी एसबीआयचा पर्याय नक्कीच फायद्याचा राहणार आहे. दरम्यान आता आपण एसबीआय कडून 40 लाखांचे होम लोन घ्यायचे असेल तर किती पगार हवा याची माहिती पाहणार आहोत.
चाळीस लाखांच्या होम लोन साठी किती पगार हवा?
एसबीआयकडून जर चाळीस लाखांचे होम लोन घ्यायचे असेल तर तुमचा महिन्याचा पगार 56 हजार रुपये असणे आवश्यक आहे. वार्षिक सहा लाख 72 हजार रुपये पॅकेज असणाऱ्या म्हणजेच महिन्याचा पगार 56 हजार रुपये असणाऱ्या ग्राहकांना एसबीआय कडून 40 लाख रुपयांपर्यंतचे होम लोन मंजूर होऊ शकते.
मात्र यासाठी सदरील ग्राहकांवर आधीपासूनच कोणत्याही प्रकारचे कर्ज नसावे. जर एखाद्या ग्राहकावर आधीपासूनच एखाद्या कर्जाचे ओझे असेल तर त्यांना 56 हजार पगार असूनही चाळीस लाखांचे कर्ज मंजूर होऊ शकत नाही.
किती हफ्ता भरावा लागणार?
जर समजा एखाद्या ग्राहकाला 30 वर्षांसाठी 40 लाख रुपयांचे होम लोन किमान 7.50% व्याजदरात मंजूर झाले तर अशा ग्राहकाला महिन्याला 28 हजार रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. मात्र बँकेच्या व्याजदरात कपात झाली किंवा बँकेचे व्याजदर वाढलेत तर EMI ची रक्कम सुद्धा कमी – जास्त होणार आहे.